एक्स्प्लोर

Shivdeep Lande Bihar Election Result 2025: महाराष्ट्राचा सुपुत्र पण कर्मभूमी बिहार असलेल्या शिवदीप लांडेंचं विधानसभा निवडणुकीत काय झालं? किती मतं मिळाली?

Bihar Election Result 2025: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत एनडी आघाडीला 208 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. अवघ्या 29 जागांवर महागठबंधनचे उमेदवार आघाडीवर

Shivdeep Lande Bihar Election Result 2025: संपूर्ण देशाचे  लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. आतापर्यंतच्या कलानुसार बिहारमध्ये एनडीए आघाडीला भक्कम आघाडी मिळाली आहे. एनडीए आघाडीचे उमेदवार 207 जागांवर आघाडीवर आहेत. तर महागठबंधनचे (Mahagathbandhan) उमेदवार अवघ्या 29 जागांवर आघाडीवर आहे. तर सहा जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे भाजप आणि संयुक्त जनता दल बिहारमध्ये (Bihar Election Result 2025) सहजपणे सत्ता स्थापन करेल, असे संकेत मिळत आहेत. बिहारच्या निवडणुकीत अनेक बड्या नेत्यांचे भवितव्य पणाला लागले होते. यामध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र असलेल्या आणि बिहारचा सिंघम अशी ओळख असलेल्या शिवदीप लांडे (Shivdeep Lande) यांच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. शिवदीप लांडे हे बिहारच्या जमालपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर जदयूच्या नचिकेता मंडल यांचे आव्हान होते. 

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, शिवदीप लांडे यांना 8536 मतं मिळाली आहेत. जमालपूर मतदारसंघात सध्या जदयूचे नचिकेता मंडल आघाडीवर आहेत. त्यांना आतापर्यंत 50335 मतं मिळाली असून त्यांच्याकडे तब्बल 19 हजार मतांची आघाडी आहे. जमालपूर मतदारसंघात मतमोजणीच्या 28 पैकी 14 फेऱ्या पार पडल्या आहेत. आतापर्यंतच्या फेऱ्यांमध्ये  नचिकेता मंडल यांनी आघाडी टिकवून ठेवली आहे. तर शिवदीप लांडे यांना 8536 मतं मिळाली असली तरी ते तिसऱ्या स्थानावर आहेत.

बिहार पोलीस दलात 18 वर्षे काम केल्यानंतर शिवदीप लांडे (Shivdeep Lande) यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला होता. शिवदीप लांडे यांनी निवडणुकीपूर्वी हिंद सेना पक्षाची स्थापना केली होती. मात्र, ते या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढले. शिवदीप लांडे यांनी बिहार पोलिसांच्या सेवेत असताना उल्लेखनीय काम केले होते. ते 2009 मध्ये मुंगेरमध्ये एएसपी म्हणून रुजू झाले होते आणि 2011 पर्यंत तिथेच काम केले. तीन वर्षांत मुंगेर मधील गुन्हेगारी संपवण्यावर भर दिला. यामुळे मुंगेरमध्ये शिवदीप लांडे यांना मानणारा मोठा तरुण वर्ग आहे. या भागात त्यांची लोकप्रियता प्रचंड होती. मात्र, ही लोकप्रियता त्यांना विजयाच्या उंबरठ्यापर्यंत घेऊन जाऊ शकली नाही.

Shivdeep Lande News: कोण आहेत शिवदीप लांडे?

शिवदीप लांडे हे राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत. 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले शिवदीप लांडे हे सध्या बिहारच्या स्पेशल टास्क फोर्समध्ये अधीक्षक होते. त्यांच्या बेधडक कामाच्या पद्धतीमुळे ते बिहारच्या जनमानसात प्रचंड लोकप्रिय आहेत. मध्यंतरी त्यांनी  मुंबईत अमली पदार्थ विरोधी कक्षातही काम केले होते. तेव्हाही  शिवदीप लांडे यांनी ड्रग्ज तस्करांचे कंबरडे मोडले होते. तर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त असताना अनेक महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आणले होते. राज्यात गाजलेल्या मनसुख हिरण हत्याप्रकरणाच्या तपासातही शिवदीप लांडे यांचा समावेश होता.

Vijay Shivtare: जावई पराभवाच्या छायेत, विजय शिवतारे काय म्हणाले?

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजय शिवतारे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर त्यांनी म्हटले की, मी बिहार निवडणुकीसंदर्भात काही बोलणार नाही. स्थानिक निवडणुकांच्या संदर्भात मी उद्या किंवा परवा माझी भूमिका मांडेल, असे शिवतारे म्हणाले आहेत.

आणखी वाचा

अजित पवारांची महत्त्वाकांक्षा धुळीला मिळाली, बिहार निवडणुकीत राष्ट्रवादीचं वाट्टोळं झालं, 13 उमदेवारांचं डिपॉझिट जप्त होण्याच्या मार्गावर

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget