एक्स्प्लोर

Bihar Election Result 2025 Devendra Fadnavis: बिहारच्या निकालावर देवाभाऊची छाप, 7 जिल्ह्यातील 49 मतदारसंघातील उमेदवार आघाडीवर!

Bihar Election Result 2025 Devendra Fadnavis: बिहार निवडणुकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराचा देखील एनडीएला फायदा झाल्याचे समोर येत आहे.

Bihar Election Result 2025 Devendra Fadnavis: बिहार विधानसभा निवडणुकीचा (Bihar Election Result 2025) आज निकाल आहे. आतापर्यंत (दुपारी 12.30) 243 पैकी 243 जागेचा कल हाती लागला आहे. यामध्ये एनडीए 189 जागांवर, महागठबंधन 50 जागांवर आणि इतर 4 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, बिहार निवडणुकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रचाराचा देखील एनडीएला फायदा झाल्याचे समोर येत आहे.

बिहारमधील 61 मतदारसंघांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा प्रभाव पडला. बिहारमधील 61 मतदारसंघापैकी 49 मतदारसंघात एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 जिल्ह्यात काही मतदारसंघात प्रचार केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये प्रचार सभा आणि रॅली केल्या होत्या. दरम्यान, मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात थोड्याच वेळात बिहार निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल जल्लोष केला जाणार आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार केलेले जिल्हे- (Devendra Fadnavis Bihar Election 2025)

- सारन 
- सिवान 
- पाटणा 
- मुझफ्फरपूर 
- सहरसा 
- खगडिया 
- समस्तीपूर 

  1. सारन - 10 पैकी 9 एनडीए उमेदवार आघाडीवर 
  2. सिवान - 8 पैकी 6 एनडीए उमेदवार आघाडीवर 
  3. पाटणा - 14 पैकी 11 एनडीएचे उमेदवार आघाडीवर 
  4. मुझफ्फरपूर- 11 पैकी 10 एनडीए उमेदवार आमदार 
  5. सहरसा - 4 पैकी 3 एनडीए उमेदवार आघाडीवर 
  6. खगडिया - 4 पैकी चारही एनडीए उमेदवार आघाडीवर 
  7. समस्तीपूर - 10 पैकी 6 एनडीए उमेदवार आघाडीवर

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले? (Chandrashekar Bawankule On Bihar Election)

केंद्र सरकार आधीच मजबूत आहे, या निकालाने NDA आणखी मजबूत होईल. या निकालाने एनडीएची ताकद वाढून एनडीए आणखी घट्ट होणार आहे. निवडणूक नंतर आरोप-प्रत्यारोप होत राहतील. पक्षात शिल्लक असलेले कार्यकर्ते पक्षात राहावे, संकुचित होत असलेली पार्टी वाचावी, यासाठी आता निवडणुकीनंतर आरोप प्रत्यारोप होतील. निकाल येण्यापूर्वीच राहुल गांधी विदेशात निघून गेले आहेत. पुन्हा ईव्हीएमचे खेळ खेळले जातील. मतदार यादी चुकली होती, हे खेळ खेळले जातील. असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

2020  विधानसभा निवडणुकीचे निकाल (Bihar Election Result 2020)

मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने 74 जागा, जेडीयूने 43 आरजेडीने 75 , एलजेपीने 1, एआयएमआयएमने 5, काँग्रेसने 19, सीपीएमने 2, सीपीआयने 2 आणि बसपाने 1 जागा जिंकल्या होत्या.

बिहार निवडणुकीच्या निकालाचे सर्व अपडेट्स, VIDEO:

संबंधित बातमी:

Bihar Election Result 2025 Live Updates: अलीनगरमधून मैथिली ठाकूरची मोठी आघाडी; 6 फेऱ्यांनंतर 8,500 मतांनी आघाडीवर

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mandar Kiwale Case: 'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
IND vs NZ 2nd Test Day-1 : 110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Chhatrapati Sambhajinagar : वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
Vasai Crime News : वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात

व्हिडीओ

No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mandar Kiwale Case: 'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
IND vs NZ 2nd Test Day-1 : 110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Chhatrapati Sambhajinagar : वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
Vasai Crime News : वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
IND vs SL : पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! आशिया कप स्पर्धेतून बाहेर, रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
Parliament Session : 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
Packaged Food Label : पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
Embed widget