एक्स्प्लोर

Punjab Cabinet: भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 25 हजार सरकारी नोकऱ्या देण्याची घोषणा

Punjab : पंजाब निवडणुकीत बहुमत मिळाल्याने आम आदमी पार्टीनं (AAP) आपलंल सरकार स्थापन केलं आहे. आज कॅबिनेट स्थापन होताच त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

Punjab : पंजाब निवडणुकीत एकहाती विजय मिळवत आप पक्षानं आपलं सरकार पंजाबमध्ये स्थापन केलं आहे. त्यामुळे भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या नेतृत्वाखाली आता आपचं सरकार पुढील पाच वर्ष पंजाबमध्ये सत्तेत असणार आहे. भगवंत मान यांनी आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा केल्यानंतर कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधीही पार पडला आहे. ज्यानंतर पहिल्याच दिवशी कॅबिनेट मीटींगमध्ये तब्बल 25 हजार सरकारी नोकऱ्य़ा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार तरुणांमधील सर्वात मोठ्या बेरोजगारीच्या प्रश्नाचं निवारण करणार आहे. या 25 हजार नोकऱ्यांमधील 10 हजार नोकऱ्या पोलीस विभागात तर इतर 15 हजार नोकऱ्या या इतर विविध विभागात आहे. कॅबिनेटच्या निर्णयानुसार पुढील एका महिन्यात या नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. 

असं आहे पंजाबचं मंत्रिमंडळ

  • Harjot Singh Bains : हरजोत सिंह बैंस हे आम आदमी पार्टीकडून आनंदपूर साहिब मतदारसंघातून निवडून आले. ते वकील आहेत, त्यांचं शिक्षण बीए एलएलबीपर्यंत झालं आहे.
  • Lal Chand Kataruchak : लाल चंद कटारुचक - पठानकोटचे रहिवासी असलेल्या लालचंद यांनी भोज विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांचं शिक्षण दहावीपर्यंत झालं आहे.  
  • Laljit Singh Bhullar : लालजीत सिंह भुल्लर यांनी पट्टी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवत आमदारकी मिळवली आहे. त्यांचं शिक्षण 12 वीपर्यंत झालं आहे.  
  • Kuldeep Singh Dhaliwal : कुलदीप सिंह धालीवाल यांनी अजनाला विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.  त्यांचं शिक्षण दहावीपर्यंत झालं आहे. कुलदीप यांचा परिवार काँग्रेसशी संबंधित होता.  
  • Dr Baljit Kaur : डॉ. बलजीत कौर - मान यांच्या मंत्रिमंडळातील एकमेव महिला चेहरा आहेत डॉ. बलजीत कौर. त्यांनी मलौत विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला.  डॉक्टर बलजीत कौर फरीदकोटचे माजी खासदार साधू सिंह यांच्या कन्या आहेत. त्या डोळ्यांच्या डॉक्टर आहेत.  
  • Gurmeet Singh Meet Hayer : गुरमीत सिंह मीत हेयर बरनाला विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. ते दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. गुरमीत सिंह इंजिनिअर आहेत.  
  • Harpal Singh Cheema : हरपाल सिंह चीमा नाभामध्ये राहतात. ते वकील आहेत.  हरपाल सिंह चीमा दिडबा  विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवत आमदार झालेत. त्यांनी पंजाब विद्यापीठात विद्यार्थी नेता म्हणूनही कारकीर्द गाजवली आहे. ते दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. 
  • Harbhajan Singh ETO : हरभजन सिंह ईटीओ  यांनी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. हरभजन सिंह वकील आहेत.
  • Brahm Shankar Jimpa : ब्रह्म शंकर शर्मा यांनी होशियारपूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.   ब्रह्मशंकर बारावीपर्यंत शिकले आहेत.  
  • Dr Vijay Singla : डॉ. विजय सिंगला मानसा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेस उमेदवार प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला यांचा पराभव केला.  डॉ. विजय सिंगला हे डेटिस्ट आहेत.  

हे ही वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Sunil Kedar: सुनील केदारांच्या अडचणी वाढल्या, नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील रोखे घोटाळा हत्येपेक्षा गंभीर; उच्च न्यायालयाची खरमरीत टिप्पणी
सुनील केदार अध्यक्ष असताना घडलेला घोटाळा हत्येपेक्षाही गंभीर; उच्च न्यायालयाची खरमरीत टिप्पणी
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
Embed widget