एक्स्प्लोर

Vidhansabha 2024: पुणे तिथे काय उणे! मतदान होताच झळकले विजयाचे बॅनर; शिवाजीनगर, खडकवासला मतदारसंघात या उमेदवारांना विजयाचा 100 टक्के विश्वास

Pune Vidhansabha 2024: 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. तत्पुर्वी पुण्यातील दोन मतदारसंघामध्ये विजयी उमेदवारांचे बॅनर झळकले आहेत.

पुणे : आज राज्यातील विधानसभेसाठीच्या 288 मतदारसंघांसाठी मतदान पार पडलं आहे. नागरिक मतदान केंद्रावर जाऊन उत्साहात मतदान करताना दिसले. राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झालं आहे. दरम्यान आता उमेदवारांचं भवितव्य मतदान पेटीत बंद आहे. 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. तत्पुर्वी पुण्यातील दोन मतदारसंघामध्ये विजयी उमेदवारांचे बॅनर झळकले आहेत. आज मतदान प्रक्रिया पार पडते न पडते तोच पुण्यात लागलेले हे विजयाचे बॅनर चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहेत. 

कोणत्या मतदारसंघात झळकले बॅनर? 

पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना शुभेच्छा देणारे बॅनर लागले आहेत. पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघ 2014 पासून भाजपचा किल्ला आहे. भाजपचे सिद्धार्थ शिरोळे हे विद्यमान आमदार असून ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.  त्यांनी 2019 साली काँग्रेसचे दत्ता बहिरट यांचा पराभव केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा सिद्धार्थ शिरोळे आणि दत्ता बहिरट पुन्हा एकदा समोरासमोर उभे ठाकले आहेत.  शिवाजीनगर मतदारसंघामध्ये 44.95 टक्के मतदान झाले आहे. मात्र, निकालाआधीच  सिद्धार्थ शिरोळे यांच्या विजयाचे आणि शुभेच्छा देणारे बॅनर लागले आहेत.

तर दुसरीकडे मतदान संपताच खडकवासला मतदारसंघाचे मविआचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन दोडके यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली आहे. त्याचबरोबर फटाके फोडत आणि सचिन दोडके यांना खांद्यावर घेत मोठी मिरवणूक काढली. दोडकेंची मिरवणूक सध्या मतदारसंघात चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. मतदान संपताच दोडके यांच्या विजयाचे फ्लेक्स लागले आहेत. कार्यकर्त्यांकडून कार्यालयाच्या बाहेर जोरदार जल्लोष करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर देखील लावण्यात आले आहेत.

खडकवासला मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे भीमराव तापकीर, मनसेचे उमेदवार मयुरेश रमेश वांजळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दोडके सचिन यांच्यात तिरंगी लढत झाली आहे. मात्र, निकालाआधी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार सचिन दोडके यांची विजयी मिरवणूक काढली आहे. मात्र, राज्यातील 288 मतदारसंघातील उमेदवारांसह नागरिकांचं लक्ष्य निकालाकडे लागलं आहे. आज मतदान प्रक्रिया पार पडते न पडते तोच पुण्यात लागलेले हे विजयाचे बॅनर चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहेत. 

शहरातील आठ मतदारसंघातील दुपारी 5 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी

वडगाव शेरी 50.46  टक्के.

 शिवाजीनगर 44.95 टक्के.

 कोथरूड  47.42 टक्के.

 खडकवासला 51.56  टक्के.

 पर्वती  48.65 टक्के.

 हडपसर 45.02   टक्के.

 पुणे कॅन्टोन्मेंट  47.83 टक्के.

 कसबा पेठ 54.91 टक्के.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Aditya Thackeray vs Eknath Shindeठाकरे-शिंदे आमनेसामने, त्या बैठकीत नेमकं काय घडलंKunal Kamra Controversy Shiv Sena Todfod :  कुणाल कामराचं वादग्रस्त विडंबन, राजकारणात टीकेचा सूरSpecial Report Bulldozer Action Nagpur Violence : नागपुरात हल्लेखोरांविरोधात पालिका अॅक्शन मोडवरDharavi Fire Cylinder Blast : धारावीत सिलेंडरच्या वाहनाला आग, सिलेंडरच्या स्फोटांनी धारावी हादरली!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
OTT Web Series: OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Embed widget