एक्स्प्लोर

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ | सेलिब्रिटी मतदारसंघाचं पारडं कुणाच्या बाजूनं?

मात्र एकीकडे ही हायक्लास लोकवस्ती तर दुसरीकडे याच मतदारसंघात नर्गिस नगरसारखा झोपडपट्टीचा भागसुद्धा आहे. त्यामुळे सेलिब्रिटी, उच्चभ्रू आणि सामान्य, झोपडपट्टीवासिय असे दोन टोकांचे मतदार या मतदारसंघात मोठ्या संख्येने आहेत.

वांद्रे पश्चिम हा मुंबई उपनगरांतला विधानसभा मतदारसंघ आहे.  पाली हिलची उच्चभ्रू लोकवस्ती आणि सेलिब्रिटी, सिनेकलाकार यांचं वास्तव्य म्हणून या मतदारसंघाकडे विशेष लक्ष असतं.  सध्या या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत आशिष शेलार. आशिष शेलारांकडे सध्या शिक्षण खात्याच्या मंत्रीपदाचीही जबाबदारी आहे. भाजपचा एक महत्वाचा चेहरा म्हणून आशिष शेलारांकडे पाहिलं जातं. त्यामुळे, हा मतदारसंघ भाजप आणि शेलारांसाठी प्रतिष्ठेचा ठरतो. कसा आहे वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ उच्चभ्रू वस्ती, फिल्म स्टार, सेलिब्रिटींची आलिशान घरं यांमुळे या वांद्रे पश्चिमकडे कायमच अप्रूप नजरेनं पाहिलं जातं. मुंबईतला उच्चभ्रु लोकवस्तीचा हा परिसर आहे. उच्चभ्रू वस्तीत नागरी सुविधांची म्हणावी तशी कमतरता नाही. इथे सर्वसामान्य मध्यमवर्गिय मुंबईकर घर घेण्याचा स्वप्नातही विचार करु शकत नाही. मुंबईतला सर्वात जास्त महाग असलेल्या जागांपैकी वांद्रे पश्चिम हा एक भाग आहे. मात्र एकीकडे ही हायक्लास लोकवस्ती तर दुसरीकडे याच मतदारसंघात नर्गिस नगरसारखा झोपडपट्टीचा भागसुद्धा आहे. त्यामुळे सेलिब्रिटी, उच्चभ्रू आणि सामान्य, झोपडपट्टीवासिय असे दोन टोकांचे मतदार या मतदारसंघात मोठ्या संख्येने आहेत. मतदारांची संख्या पुरुष – 1,52,126 महिला – 1,34,495 एकूण मतदार – 2,86,621 मदार कोणत्या मतांवर आजवरचा इतिहास पाहता या मतदारसंघाचा निकाल सामान्य नागरिक आणि झोपडपट्टीवासियांनीच ठरवलाय. सेलिब्रिटींपेक्षा सामान्य आणि झोपडपट्टीतील मतदार मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर पडतो. मात्र, सध्या सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, मतदानासंबंधी जनजागृतीमुळे या मतदारसंघातले किती सेलिब्रिटी कलाकार मतदान करायला बाहेर पडतात याकडे सर्वांचंच लक्ष असतं. मतदानाच्या दिवशी सेलिब्रिटींनी केलेलं मतदान हा आकर्षणाचा विषय असतो. त्यामुळे, एखाद्या कलाकारानं, सेलिब्रिटीनं मतदान केलं नाही तर, मतदानाच्या दिवशी इतर कामांना प्राधान्य दिलं तर मात्र त्यांच्यावर टीकाही होते. हे ही वाचा - वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ | मातोश्रीच्या अंगणातला गड वाचवण्यासाठी शिवसेनेला जोर लावावा लागणार सर्वसाधारणपणे, 40 ते 50 टक्क्यांपर्यंत या मतदारसंघात मतदान होतं. 2014 पर्यंत हा झोपडपट्टीतला मतदार काँग्रेससोबत होता. 2014 पूर्वीपर्यंत काँग्रेसचे बाबा सिद्दीकी यांच्या पारड्यात मतं जात होती. मात्र, 2014 मध्ये याच सामान्य मतदाराला आपल्याकडे खेचण्यात भाजपला यश आलं. यंदाही सेलिब्रिटी मतांसोबतच भाजप झोपडपट्टीवासियांची मतं जिंकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करेलच. मात्र तरीही ऐन वेळी निकाल फिरुही शकतो. निकाल फिरवण्याची ताकद या मतांमध्ये अल्पसंख्याक आणि ख्रिश्चन समाजाच्या व्होटबँकेवर या मतदारसंघातली गणितं कधीही फिरू शकतात. या मतदारसंघात एकूण 274 मतदान केंद्र आहेत. मुंबई महापालिकेत नगरसेवकपदाची कारकीर्द गाजवलेले, मुंबई भाजपचं अध्यक्षपदाची जबाबदारी भूषवलेले आमदार आशिष शेलार यांचा चेहरा मुंबईत भाजपचा चेहरा आहे. पेशानं अॅडव्होकेट असणाऱ्या शेलारांनी बरेचदा शिवसेनेला अंगावर घेतलंय. विशेषत: सेनेला त्यांनी मुंबई महापालिकेतील गैरकारभार, घोटाळे यांवरुन लक्ष्य केलं. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंवर तर अनेकदा आशिष शेलारांनी तोफ डागलीय. 2014 च्या निवडणुकीत विधानसभेवर जाण्याआधी आशिष शेलार विधानपरिषदेवर आमदार म्हणून पक्षाचं प्रतिनिधित्व करत होते. मात्र, त्याचवेळी ते मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून देखील सत्ताधारी शिवसेनेला कडवी टक्कर देत होते. हे देखील वाचा -चांदिवली विधानसभा मतदारसंघ | नसीम खान यांच्यासमोर यंदा तगडे आव्हान 2013 मध्ये त्यांची मुंबई अध्यक्षपदी निवड झाली आणि 2014 मध्ये वांद्रे पश्चिममधून त्यांना उमेदवारी देखील देण्यात आली. त्यामुळे मुंबई अध्यक्षपदासाठी भाजपनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मुंबईतच बालपण गेलेल्या आशिष शेलार यांनी सुरुवातीपासूनच भाजपच्या मुशीत राजकारणाचे धडे गिरवले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानल्या जाणाऱ्या आशिष शेलार यांना यंदाच्या सरकारमध्ये शेवटी शेवटी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आलीय. भाजपला फाईट कुणाची खरं तर या मतदारसंघात सध्या भाजपचीच चलती आहे. आशिष शेलारांचा जनसंपर्क आणि पक्षानं दिलेल्या जबाबदाऱ्या यांमुळे यंदाही शेलारांचंच पारडं जड असल्याचं जाणवतं. भाजप-सेनेची युती झाली तर आशिष शेलार यांना तिकीट नक्की असेलच. मात्र, युती झाली नाही तरी शेलारांना फाईट देऊ शकेल असा चेहरा सेनेकडे या मतदारसंघात नाही. काँग्रेसकडून गेल्या वेळी निवडणूक लढवलेल्या बाबा सिद्दीकींचं नाव पुन्हा चर्चेत आहे. मात्र, बाबा सिद्दींकींना पुन्हा संधी देण्याऐवजी काँग्रेस नव्या चेहऱ्याचाही विचार करु शकेल. आणि हा नवा चेहरा असेल मुंबई महापालिकेत उत्तम कामगिरी करणारे इथले काँग्रेसचे नगरसेवक आसिफ झकेरिया. आसिफ झकेरियांना इथल्या कामाचा आवाका आणि लोकांच्या गरजा पुरेपुर माहित आहेत. इतर मतदारसंघांइतकी इथल्या नागरी सुविधांची अवस्था तशी वाईट नाही. मात्र, वाहतूकीचे प्रश्न, रस्ते,  कचरा यांबाबतच्या समस्या जैसे थे आहेत. मनसे आणि वंचित कडून या ठिकाणी कोण मैदानात उतरेल यांबाबत सध्या चित्र धूसर आहे.  त्यामुळे, वांद्रे पश्चिम मध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा सरळ सामना आहे. विधानसभा निवडणूक 2014 निकाल 1) आशिष शेलार, भाजप – 74,779 2) बाबा सिद्दीकी, काँग्रेस – 47,868 3) विलास चावरी, शिवसेना – 14,156 4) तुषार आफळे, मनसे – 3116 5) आसिफ भामला, राष्ट्रवादी – 2387 जाणून घ्या या मतदारसंघाविषयी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special ReportRajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special ReportEknath Shinde Car Ride : एकनाथ शिंदेंच्या हाती 50 वर्ष जुन्या विंटेज कारचं स्टेअरिंग Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Embed widget