Balaji Kalyankar : ठाकरेंच्या उमेदवार संगीता डक यांच्या घरासमोर हुल्लडबाजी, आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मुलासह भावावर गुन्हा दाखल
Balaji Kalyankar, Nanded : नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवार संगीता पाटील डक यांच्या घरासमोर जाऊन आमदार बालाजी कल्याणकर यांच्या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली होती, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Balaji Kalyankar, Nanded : नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवार संगीता पाटील डक यांच्या घरासमोर जाऊन आमदार बालाजी कल्याणकर यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. डक यांच्या कारवर फटके फोडण्यात आले होते, त्यामुळे कारला आग देखील लागली होती. दरम्यान, कल्याणकर यांच्या गटाने हुल्लडबाजी केल्यानंतर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मुलासह भावावर आणि इतर काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अधिकची माहिती अशी की, आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मुलासह भाऊ आणि इतरांवर गुन्हे दाखल गुन्हा दाखल करण्यात आलाय. मतमोजनीच्या दिवशी सायंकाळी ठाकरे गटाच्या उमेदवार संगीता पाटील डक यांच्या घरासमोर जाऊन हुल्लडबाजी करण्यात आली होती. कल्याणकर यांच्या कार्यकर्त्यांनी डक यांच्या घरासमोर जात त्यांच्या कारवर फटाके फोडले होते. फटाक्यांमुळे जीपला आग लागली होती. दरम्यान यानंतर हातात पिस्टल आणि तलवार घेऊन घर पेटवून दिल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी महत्त्वाची माहिती म्हणजे, आमदार बालाजी कल्याणकर यांचे पुत्र सुहास कल्याणकर, भाऊ एकनाथ कल्याणकर आणि इतर 15 ते 20 जणांवर गुन्हे दाखल दाखल करण्यात आले आहेत. दंगा भडकवने, शस्त्र प्रदर्शन, जीवे मारण्याची धमकी देणे, जमाव बंदीचे उल्लंघन करणे यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल झालाय.
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून बालाजी कल्याणकर विजयी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. महायुतीने निवडणुकीत एकहाती विजय मिळवलाय. महाराष्ट्राप्रमाणे नांदेड जिल्ह्यातही महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागलाय. महायुतीने नांदेड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवलाय. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेकडून बालाजी कल्याणकर तर ठाकरे गटाकडून संगीता पाटील यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत बालाजी कल्याणकर यांनी निसटता विजय मिळवलाय.
नांदेड जिल्ह्यात मात्र काँग्रेसचा चांगला सुपडा साफ झालाय. सहा महिने पूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला होता. मात्र, विधानसभेमध्ये काँग्रेसची चांगलीच वाताहात झाली. नांदेड जिल्ह्यात काँग्रेस म्हणजे अशोक चव्हाण आणि अशोक चव्हाण म्हणजेच काँग्रेस हे समीकरण जुळलेले होतं. मात्र अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर आता अशोक चव्हाण म्हणजेच भाजप आणि भाजप म्हणजेच अशोक चव्हाण अशी म्हणायची वेळ आली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत जरांगे फॅक्टर मराठवाड्यात पाहायला मिळाला होता. जरांगे फॅक्टरमुळे मराठवाड्यात महायुतीला चांगलाच झटका बसला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर चाललेला नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या