अर्ज मागे घे, विधानसभा अध्यक्षांचाच दबाव, धमक्या; खासदार अरविंद सावंतांनी सांगितला भाजपचा 'बिनविरोध पॅटर्न'
ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केलीय. अर्ज मागे घेण्यासाठी राहुल नार्वेकर यांच्याकडून दबाव आणि धमक्या येत असल्याचा आरोप सावंत यांनी केला.
Arvind Sawant : राज्यात महापालिका निवडणुकींच्या (Maharashtra Municipal Corporation Election 2026) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. आजपासून निवडणुकीला खरी सुरुवात झाली आहे. कारण आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. आजच्या दिवशी अनेक उमेदवारांनी बंडखोरी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षातील उमेदवारांनी बंडाचं निशाण उगारलं आहे. दरम्यान, या निडणुकीवर राजकीय आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. अर्ज मागे घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून दबाव आणि धमक्या येत असल्याचा आरोप सावंत यांनी केला.
पवार कुटुंबीयांना संरक्षण द्या, त्या कुटुंबाला काही झालं तर राहुल नार्वेकर जबाबदार असतील
दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी उमेदवारांशी संवाद साधला. आदित्यजी आणि अमितजी यांनी नव्या उमेदवारांना मार्ग दाखवल्याचे मत सावंत यांनी व्यक्त केले. तसेच यावेळी सावंत यांनी भाजपवर देखील जोरदार टीका केली. या महाराष्ट्रात काय सुरु आहे. 21 जण बिनविरोध निवडून आले आहेत. त्यातील एक मुंबई शहरातील प्रभाग क्रमांक 226 मध्ये तेजल पवार या महिला उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे. त्यांचा अर्ज मागे घ्यावा म्हणून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे संपूर्ण कुटुंब परिवार हा तेजल पवार यांच्या मागे लागलेला असल्याचा आरोप अरविंद सावंत यांनी केला आहे. AB फॉर्म भरल्यानंतर आजपर्यंत ते घरी जाऊ शकलेले नाही. तेजल पवार हे त्यांचा मुलांना घेऊन बाहेर आले आहेत. माझ्या भावाला बिनविरोध निवडून आणा असं म्हणतात आणि त्यांची माणसं देखील धमकावत आहेत. मुंबई शहरांचे आयुक्त देवेन भारती यांना मी विनंती करतो की यां पवार कुटुंबीयांना पहिलं संरक्षण द्या. त्या कुटुंबाला काही झालं तर जबाबदार हे फक्त राहुल नार्वेकर असतील असे सावंत म्हणाले.
महानगरपालिकेच्या निवडुकीला सुरुवात
महानगरपालिकेच्या निवडुकीला सुरुवात झाली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. तर काही जणांनी बंडखोरी देखील केली आहे. दरम्यान, काही ठिकाणी भाजपचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच शिवसेना शिंदे गटाचे देखील नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. दरम्यान, सध्या मुंबईत महानगरपालिकेच्या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु आहे. कारण दोन ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. तिकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र आले आहेत. तर अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवत आहे.
महत्वाच्या बातम्या:





















