Arvind Kejriwal On Delhi Election 2025: भाजपाने दिल्ली जिंकली, आम आदमी पार्टीचा पराभव; अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...
Arvind Kejriwal On Delhi Election 2025: दिल्लीत बहुमतासाठी 36 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजप एकहाती सत्ता स्थापन करेल, असं सध्याच्या आकडेवारीवरुन दिसून येतंय.

Arvind Kejriwal On Delhi Election 2025 नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Election 2025) भाजपने (BJP) आम आदमी पार्टीला (AAP) जोरदार धक्का देत विजय मिळवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे भाजपने दिल्ली विधानसभेवर आपला झेंडा फडकावलाच. मात्र हा दणदणीत विजय मिळवताच आपचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal), उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, ज्येष्ठ नेते सत्येंद्र जैन यांनाही पराभवाची धूळ चाखायला लावली.
2020 च्या तुलनेत भाजपने या निवडणुकीत षटपटीने यश मिळवलं. 2020 च्या तुलनेत भाजपच्या 39 अधिक जागा आल्या. आपने दिल्लीची सत्ता गमावली. आपचा गेल्या दोन टर्ममधला झंझावाती वारू भाजपने 2025 च्या निवडणुकीत रोखला. दरम्यान, दिल्लीत एकूण 70 विधानसभा मतदारसंघ आहे. यामध्ये 47 जागांवर भाजप, तर 23 जागांवर आप सध्या आघाडीवर आहे. काँग्रेसने एकही जागा जिंकलेली नाही. दिल्लीत बहुमतासाठी 36 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजप एकहाती सत्ता स्थापन करेल, असं सध्याच्या आकडेवारीवरुन दिसून येतंय.
अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया-
दिल्लीतील सत्ता हातून निसटल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करतो. मला आशा आहे की विजय उमेदवार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतील. गेल्या 10 वर्षांत जनतेसाठी केलेले काम त्यांच्यासमोर आहे. जनतेचा निर्णय आम्ही मान्य करतोय. आम्ही आता सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावू, असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. आम्ही सत्तेसाठी राजकारणात आलो नाहीय, असंही अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. तसेच या निवडणुकांमध्ये उत्तम काम केल्याबद्दल मी आम आदमी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, असंही अरविंद केजरीवाल म्हणाले.
#WATCH | On #DelhiElection2025, AAP national convener and former Delhi CM, Arvind Kejriwal, "We accept the mandate of the people with great humility. I congratulate the BJP for this victory and I hope they will fulfil all the promises for which people have voted them. We have… pic.twitter.com/VZOwLS8OVH
— ANI (@ANI) February 8, 2025
परवेश वर्मा ठरले जायंट किलर-
नवी दिल्ली मतदारसंघातून केजरीवाल यांना पराभूत करत भाजपचे परवेश वर्मा हे जायंट किलर ठरले. त्याचबरोबर दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियाही या निवडणुकीत पराभूत झाले. जंगपुरा मतदारसंघातून सिसोदिया यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपच्या तरविंदरसिंग मारवाह यांच्याकडून सिसोदिया पराभूत झालेत. केजरीवाल आणि सिसोदियांच्या पराभवाचा सर्वात मोठा धक्का आपला सहन करावा लागलाय. मात्र एकीकडे हे दोन मोठे धक्के बसले असतानाच दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांची जागा मात्र थोडक्यात वाचली.
अरविंद केजरीवालांचा पराभव, 'आप'ला सर्वात मोठा धक्का, VIDEO:
संबंधित बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
