उद्धव ठाकरेंच्या 'पेन'वरुन एकनाथ शिंदेंचं विधान; अजितदादा खाली मान घालून खुदूखुदू हसले!
Eknath Shinde On Uddhav Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
Eknath Shinde Ajit Pawar Mahayuti मुंबई: महायुतीकडून आज अडीच वर्षांच्या कामाचे रिपोर्टकार्ड सादर करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत महायुतीच्या सरकारने केलेल्या कामाची माहिती सादर करण्यात आली. यावेळी एकनाथ शिंदेंनी विविध मुद्द्यांवर देखील भाष्य केलं.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या पत्रकार परिषदेत म्हणाले की, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये तुम्ही दोन-तीन कोटी रुपये देता...आम्ही साडेतीनशे कोटी रुपये दिले. हे जनतेचे पैसे आहेत. त्यामुळे जनतेचा जीव वाचवला पाहिजे. कोणी आमच्याकडे आला की लगेच आम्ही सही करतो. ते (उद्धव ठाकरे) तर पेन काढत नव्हते, पेन ठेवतही नव्हते..असं एकनाथ शिंदे म्हणताच अजित पवार यांना हसू आले. यानंतर पत्रकार परिषेदत उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यानंतर अजित पवार देखील साक्षीदार होते असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
आमच्या लाडक्या बहिणी करेक्ट कार्यक्रम करणार-
लाडकी बहीण योजनला मोठा प्रतिसाद आहे. सर्व लाडक्या बहिणी महायुती सरकारच्या पाठिशी आहेत. ही योजना गेम चेंजर झाली आहे. मात्र, विरोधक ही योजना (CM Ladaki Bahin Yojana) बंद करण्यासाठी कोर्टात जात आहेत. महाविकास आघाडी आमच्या सर्व योजना बंद करण्याची भाषा करीत आहे. परंतु लाडकी बहीण योजनेचा हात लावला तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे. आमच्या लाडक्या बहिणी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे, असं इशारा एकनाथ शिंदेंनी दिला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
- निवडणुकीचा शंखनाद झालाय...
- आमच्यासाठी शंखानाद तर इतरांसाठी ऐलान झालंय...
- आम्ही संक्षिप्त रिपोर्ट कार्ड आज मांडत आहोत
- स्थगिती सरकार गेल्यावर गती आणि प्रगतीचे सरकार राज्याने पाहिले....
- मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात परिवर्तनशील योजना महाराष्ट्रात आणल्या गेल्या...
- शेतकऱ्यांना वीज देण्यासाठी स्वतंत्र कंपनी तयार करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य...
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 365 दिवस वीज मिळणार आहे याचं काम सुरू आहे...
- साडेआठ रुपये दराने मिळणारी वीज तीन रुपये दराने मिळणार आहे...
- वीजबिल माफीचा निर्णय विचार करूनच घेण्यात आला आहे...
- मविआ काळात एकाही प्रकल्पाला सुधारित मान्यता मिळाली नव्हती...
- आम्ही 145 प्रकल्पांना सुधारित मान्यता दिल्याने 22 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे..
- वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प मंजूर करून 55 टीएमसी पाण्याचा प्रश्न निकाली काढून मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे...
- सिंचन क्षेत्रात भरपूर काम केलंय...
- होमगार्डच्या वेतनात भरघोस वाढ करून दिली...
- वेगवेगळ्या समाजासाठी महामंडळे तयार करून न्याय देण्याचा प्रयत्न...
- अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून 1 लाख तरुणांना उद्योजक बनविले...
- पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठीही महामंडळ करून आम्ही विचार केला...
संबंधित बातमी:
उद्धव ठाकरेंच्या त्या विधानावरुन एकनाथ शिंदेंना हसू आवरेना; देवेंद्र फडणवीसही हसत राहिले!