मोठी बातमी! दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार? सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं...
Ajit Pawar : सकाळी लवकर उठा, अलार्म बंद करा पण मतदान केंद्रावर जाऊन घड्याळाचेच बटन दाबा, असं आवाहन अजित पवारांनी पुण्यातील मतदारांना केलं.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्ववादींच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर त्यांचे विलिनीकरण होणार असल्याचे संकेत अनेकांनी दिले होते. आता त्यावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे. दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण होणार नाही आणि सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार नाहीत असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. ते पुण्यामध्ये बोलत होते.
सुप्रिया सुळेंचा राष्ट्रवादी पक्ष हा इंडिया आघाडीचा भाग आहे, त्यामुळे त्या केंद्रात मंत्री होणार नाहीत असं अजित पवार म्हणाले. तसेच दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. निवडणुकीत नंतर वेळ पडली तर पुण्यात भाजपसोबत जाणार का हा प्रश्न अनेकदा विचारुन देखील अजित पवारांनी त्यावर स्पष्ट उत्तर दिलं नाही.
अजित पवारांनी मैत्रीपूर्ण लढतीच आश्वासन दिलं होतं, पण आता ते शब्द पाळत नाहीत अशी भाजपकडून टीका केली जाते. त्यावर जेव्हा मी लढतो तेव्हा ती मैत्रीपूर्ण लढत कशी असेल? असा प्रश्न अजित पवारांनी केला.
भाजपला सत्ता गमावण्याची भीती
अजित पवार म्हणाले की, "जे लोक आमच्या धोरणांवर टीका करताहेत त्यांना पुण्यातील सत्ता गामावण्याची भीती आहे. आज मुख्यमंत्री पुण्यात आले. ते म्हणाले की 15 तारखेनंतर महायुती अभेद्य राहील. पण ते पुढे असं म्हाणाले की काहीजण फुकटची आश्वासनं देऊन मला बाजीराव म्हणा असं म्हणताहेत. पण पहिले बाजीराव पेशवे कर्तृत्ववान होते, मनगटाच्या जोरावर त्यांनी कारभारावर केला."
मुख्यमंत्री म्हणाले की 15 तारखेला उठा अलार्म बंद करा, मतदान केंद्रावर जा आणि कमळाचे बटन दाबा. पण मी म्हणतो सकाळी लवकर उठा, अलार्म बंद करा पण मतदान केंद्रावर जाऊन घड्याळाचेच बटन दाबा, असं आवाहन अजित पवारांनी केलं.
Pune Ajit Pawar : पुण्यात अजित पवारांचा रोड शो
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवारांनी पुण्यासह पिंपरी-चिंचवडसाठी सर्व ताकद पणाला लावलेली पाहायला मिळाली. प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांचा रोड शो पार पडला. नऱ्हे-आंबेगाव परिसरातील प्रभागांसाठी अजित पवारांनी प्रचार रॅली काढली. यावेळी अजित पवारांनी भाजपला जोरदार लक्ष्य केलं.
ही बातमी वाचा:




















