एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उर्मिला मातोंडकरच्या नावे वांद्र्यात चार फ्लॅट, संपत्ती किती? शिक्षण काय?
उर्मिला मातोंडकरची जंगम मालमत्ता 41 कोटी रुपयांच्या घरात आहे. यामध्ये शेअर्स, बाँड, म्युचुअल फंड (28.28 कोटी) यांचा समावेश आहे. याशिवाय उर्मिलाकडे एक मर्सिडीज कारही आहे.
मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर लोकसभेच्या रिंगणात काँग्रेसच्या तिकीटावर आपलं नशीब आजमावणार आहे. 48 वर्षीय उर्मिलाने काल (सोमवारी) वांद्र्याच्या कलेक्टर ऑफिसमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रतिज्ञापत्रात उर्मिलाने आपली संपत्ती, शिक्षण, गुन्हेविषयक माहिती जाहीर केली आहे.
उर्मिला मातोंडकरची जंगम मालमत्ता 41 कोटी रुपयांच्या घरात आहे. यामध्ये शेअर्स, बाँड, म्युचुअल फंड (28.28 कोटी) यांचा समावेश आहे. याशिवाय उर्मिलाकडे एक मर्सिडीज कारही आहे.
उर्मिलाच्या स्थावर मालमत्तेमध्ये वांद्रे परिसराती चार फ्लॅट्सचा समावेश होतो. सध्याच्या बाजारभावानुसार या फ्लॅट्सची किंमत 27.34 कोटी रुपये होते.
ठाणे जिल्ह्यातील वसईमध्ये उर्मिला मातोंडकरच्या नावे दहा एकर जमीन आहे. याची किंमत सद्यकालीन दरानुसार एक कोटी 68 लाख रुपयांच्या आसपास आहे.
VIDEO | प्रचारादरम्यान उर्मिला मातोंडकरने विद्यार्थ्यांसाठी गायलं गाणं | मुंबई | एबीपी माझा
उर्मिलाच्या शिक्षणाबाबत वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. उर्मिलाने तिचं पदवी शिक्षणही पूर्ण केलेलं नाही. तिने मुंबईतील प्रसिद्ध डी. जी. रुपारेल महाविद्यालयात शिक्षण घेतलं, मात्र द्वितीय वर्षानंतर (SYBA) तिने शिक्षण सोडून दिलं. उर्मिलाच्या विरोधात कोणताही गुन्हा नोंद नाही.
उमेदवारी अर्ज भरताना उर्मिला मातोंडकरचे पती मोहसीन मीरही तिच्यासोबत होते. दोघं जण बाईकवरुन वांद्र्यात आले. उर्मिलाचे पती मोहसीन यांच्या नावे 35 लाख रुपयांचं फिक्स डिपॉझिट आहे. दुसऱ्या अकाऊण्टमध्ये पाच लाख रुपयांचा समावेश आहे, तर 15 हजारांची रोकड आहे.
उर्मिलाचा सामना भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात होणार आहे. 2014 साली गोपाळ शेट्टींनी काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांचा साडेचार लाखांच्या मताधिक्याने पराभव केला होता.
VIDEO | भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना अभिनेत्री उर्मिला मातोंडकर टक्कर देणार | मुंबई | एबीपी माझा
संबंधित बातम्या
आंबेडकर, शिंदे, स्वामी; सोलापुरातील उमेदवारांची मालमत्ता किती?
प्रीतम मुंडे आणि बजरंग सोनवणेंवर किती कर्ज? बीडमधील उमेदवारांच्या संपत्तीचं विवरण
अहमदनगरचे भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांची संपत्ती किती?
सुळे कुटुंब अब्जाधीश, सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडे 15 कोटींची संपत्ती, प्रतिज्ञापत्रात दिली माहिती
भाजपचे अब्जाधीश उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर 89 कोटींचं कर्ज
स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टींची संपत्ती पाच वर्षात तिपटीने वाढली
उर्मिला मातोंडकरविरोधात पवई पोलिसात तक्रार, हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप
लग्नानंतर धर्म बदलला नाही, माझा नवरा मुस्लीम आहे आणि मी हिंदू : उर्मिला मातोंडकर
उर्मिला मातोंडकरला उमेदवारी जाहीर, 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवणार
देशभक्ती किंवा धर्म म्हणजे काय, हे सांगणारा भाजप कोण? काँग्रेसवासी उर्मिला मातोंडकरचा सवाल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement