ABP Opinion Poll : कोण होणार 'पंजाबचा किंग'? आपची मुसंडी तर भाजप चौथ्या स्थानी
Punjab Election : पंजाबमधील मुख्य लढत ही आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये होणार असल्याचं दिसून येतंय.
Punjab Assembly Election 2022 : पंजाबमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. एकीकडे काँग्रेसने जुन्या मुख्यमंत्र्यांचा चेहरा बदलून चरणजितसिंह चन्नी यांना मुख्यमंत्री बनवून सत्ताविरोधी लाट कमी करण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरली आहे. पंजाबमध्ये मुख्य लढत ही आप आणि काँग्रेसमध्येच असल्याचं दिसून येतंय. यामध्ये आप सत्तेत येण्याची शक्यता असून आपला 52 ते 58 जागा मिळण्याची शक्यता आहे तर काँग्रेसला 37 ते 43 जागा मिळण्याची शक्यता आहे. अकाली दलाला 17 ते 23 आणि भाजपला केवळ 1 ते 3 जागा मिळण्याची शक्यता या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आली आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा पक्षही भाजपसोबत युती करून निवडणूकीत काट्याची टक्कर देण्याच्या प्रयत्नात आहे. अशा स्थितीत राज्यातील जनता कोणाला संधी देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वेक्षणानुसार, राज्यातील 6 टक्के जनता कॅप्टन अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्री म्हणून पसंत करत आहेत. सुखबीर सिंह बादल यांना 15 टक्के, अरविंद केजरीवाल 17 टक्के, चरणजीत सिंह चन्नी 29 टक्के, नवज्योत सिंह सिद्धू 6 टक्के, भगवंत मान 23 टक्के आणि इतरांना 4 टक्के मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवत आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा फटका हा पंजाबमध्ये भाजपला बसणार असं दिसतंय.
पंजाबमध्ये मुख्यमंत्र्यांची निवड कोणाला?
चरणजितसिंह चन्नी 29 टक्के
भगवंत मान 23 टक्के
अरविंद केजरीवाल 17 टक्के
सुखबीरसिंह बादल 15 टक्के
कॅप्टन अमरिंदरसिंह 6 टक्के
नवज्योतसिंह सिद्धू 6 टक्के
इतर 4 टक्के
कोणत्या प्रदेशात किती जागा?
दोआबा प्रदेश -
पंजाब निवडणुकीत, दोआबा क्षेत्रातील एकूण 23 विधानसभा जागांपैकी काँग्रेसला 7 ते 11 जागा मिळू शकतात. तर आम आदमी पार्टीला 7 ते 11 जागा मिळू शकतात. अकाली दलाला 2 ते 6 जागा मिळू शकतात. तर भाजप एका जागेवर मर्यादित राहू शकतो.
मांझा प्रदेश -
पंजाबमधील मांझा भागात विधानसभेच्या एकूण 25 जागा आहेत. सर्वेक्षणानुसार, निवडणुकीत काँग्रेसला मांझा प्रदेशातून 14 ते 18 जागा मिळू शकतात. आम आदमी पक्षाला 3 ते 7, अकाली दलाला 2 ते 6 जागा, तर भारतीय जनता पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागेल.
माळवा प्रदेश -
पंजाबमधील माळवा प्रदेशात एकूण 69 जागा आहेत. माळवा भागात काँग्रेसला 13 ते 17 जागा मिळू शकतात. आम आदमी पक्ष माळवा भागात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. त्यामुळे ते 39 ते 43 जागा जिंकू शकतात. अकाली दलाला 10 ते 14 जागा, भाजपला 2 आणि आणखी 1 जागा मिळू शकते.
संबंधित बातम्या
ABP Opinion Poll : गोव्यात भाजप बाजी मारण्याची शक्यता
Malvika Sood : अभिनेता Sonu Sood ची बहीण मालविकाने मुख्यमंत्री चन्नी आणि सिद्धू यांच्या उपस्थितीत केला काँग्रेसमध्ये प्रवेश
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha