एक्स्प्लोर

Chhattisgarh Exit Poll: रमण सिंह चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदी बसण्याची चिन्हं

Assembly Election Exit Polls 2018 : एबीपी न्यूज-लोकनीती-सीएसडीएस यांच्या एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये भाजपला 52, तर काँग्रेसला 35 जागा मिळण्याची शक्यता आहे

मुंबई : लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून आहे. 11 डिसेंबरला सर्वच विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. मात्र त्याआधी एबीपी न्यूज-लोकनीती-सीएसडीएस यांच्या एक्झिट पोलमध्ये मतदार राजाचा कौल पाहायला मिळत आहे. एक्झिट पोलनुसार भाजप छत्तीसगडमध्ये सत्ता राखण्याची चिन्हं आहेत. म्हणजेच रमण सिंह सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान होण्याची शक्यता आहे. छत्तीसगड विधानसभेत 90 जागा असून बहुमताचा आकडा 46 आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल मंगळवार 11 डिसेंबरला जाहीर होतील, मात्र एबीपी न्यूज-लोकनीती-सीएसडीएस यांच्या एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये भाजप 48 ते 56 जागा मिळवण्याचा अनुमान आहे. काँग्रेसच्या पारड्यात 32 ते 38 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजेच भाजपला सरासरी 52, तर काँग्रेसला सरासरी 35 जागा मिळण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. तर 3 जागा इतरांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. अजित जोगी आणि मायावती यांची आघाडी छत्तीसगडमध्ये विशेष बदल घडवून आणताना दिसून येत नाही. विधानसभा निवडणूक 2013 आणि एक्झिट पोलची तुलना 2013 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 49 आणि काँग्रेसने 39 जागांवर विजय मिळवला होता. बसप आणि इतरांच्या खात्यात प्रत्येकी एक जागा होती. एक्झिट पोलची तुलना 2013 सालच्या निवडणूक निकालांशी केली, तर भाजपला तीन जागांवर फायदाच होण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसच्या चार जागा कमी होण्याची चिन्हं आहेत. एक्झिट पोलमधील निरीक्षणं रमण सिंह सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान होण्याची शक्यता भाजपला 42 टक्के, तर काँग्रेसला 37 टक्के मतं मिळण्याची शक्यता बसप आणि अजित जोगी यांच्या युतीला 12 टक्के मतं मिळण्याचा अंदाज जनता सरकारवर नाराज आहे, मात्र अजित जोगी फॅक्टरमुळे काँग्रेसला फायदा नाही बसप आणि अजित जोगी यांच्या युतीचा काँग्रेसला फटका बसण्याची चिन्हं छत्तीसगडमधील महिला मतदारांचं भाजपला मतदान मुख्यमंत्रिपदासाठी रमण सिंह फेवरेट, तर काँग्रेसचे भूपेश बघेल दुसऱ्या स्थानी संबंधित बातम्या: Assembly Election Exit Polls: भाजपच्या हातून दोन राज्यं निसटण्याचा अंदाज Madhya Pradesh Exit Poll: भाजपची हार, काँग्रेस सत्ता मिळवण्याचा अंदाज Rajasthan Exit Poll : वसुंधरा राजेंना धक्का, भाजपचे तीनतेरा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
Advertisement
metaverse

व्हिडीओ

PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामनाCM Eknath Shinde, Devendra Fadnavs आणि अजित पवार यांची 'वर्षा' बंंगल्यावर बैठकABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
Embed widget