(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP C Voter Survey: गुजरात निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर? ओवेसींसोबत मुस्लीम मतदार? 'आप'ची स्थिती काय? पाहा जनतेचा कौल
Gujarat Election ABP C-Voter Survey: गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. भाजप, काँग्रेस आणि आप पक्षासह ओवेसीही प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत.
Gujarat Election ABP C-Voter Survey: गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. भाजप, काँग्रेस आणि आप पक्षासह ओवेसीही प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. एक आणि पाच डिसेंबर रोजी गुजरातमध्ये मतदान होणार आहेत. तर आठ मतमोजणी होणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील लोकांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. एबीपी न्यूजसाठी सी-वोटरने साप्ताहिक सर्व्हे केला आहे. गुजरातमधील 2,666 जणांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. सर्व्हेमध्ये मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के इतका आहे.
1. ईशुदान गढवी यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषीत केल्याचा आपला फायदा की नुकसान?
फायदा- 53%
नुकसान- 32%
कोणताही परिणाम नाही- 15%
2. इंद्रनील राजगुरु यांनी आप सोडल्याचा फायदा की नुकसान?
फायदा-36%
नुकसान-42%
कोणताही परिणाम नाही-22%
3. हिमांशु व्यास, भगवान भाई, मोहन सिंह राठवा यांनी काँग्रेस सोडल्याचा पक्षाला फायदा की नुकसान?
फायदा-41%
नुकसान-41%
कोणताही परिणाम नाही-18%
4. 'मैंने बनाया ये गुजरात' पंतप्रधान मोदींचा गुजरातसाठी नवा नारा; भाजपला फायदा की नुकसान?
फायदा-48%
नुकसान-42%
कोणताही परिणाम नाही-10%
5. 'मैं खुश हूं' पोस्टर कॅम्पेनमुळे भाजपमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण होईल?
हो-49%
नाही-51%
6. दिग्गज नेत्यांची तिकीटं कापल्याचा भाजपला फायदा की नुकसान?
फायदा-42%
नुकसान-48%
कोणताही परिणाम नाही-10%
7. गुजरातमध्ये ओवेसी फॅक्टर मोठा होऊ शकतो?
हो-44%
नाही-25%
फॅक्टर नाही- 31%
8. गुजरातमधील मुस्लीम मतदारांचा कौल कुणाला ?
काँग्रेस-47%
आप-25%
ओवेसी-9%
भाजप-19%
9. ओवेसींच्या स्लॉटर हाऊसच्या प्लॅनचा निवडणुकीवर परिणाम होईल का ?
हो-24%
नाही-76%
10. MCD सोबत गुजरात निवडणुकीचा आप पक्षाला फायदा होईल की नुकसान?
फायदा-41%
नुकसान-40%
कोणताही परिणाम नाही-19%
मागील 25 वर्षांपासून भाजप गुजरातमध्ये सत्तेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेय. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने गुजरात मॉडलचा प्रचार करत मते मागितली होती. 2014 पासून नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून देशाचं काम पाहत आहेत. गेल्या आठवड्यात गुजरातमध्ये प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मैंने यह गुजरात बनाया है’ हा नारा दिलाय.
दोन टप्प्यात मतदान -
गुजरातमध्ये मतदान दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यांत 89 जागांवर मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यांत 93 जागांसाठी मतदान (Voting) पार पडणार आहे. 1 आणि 5 डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजेच, 8 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. दरम्यान, भाजपसाठी दोन्ही विधानसभा निवडणुका प्रतिष्ठेच्या आहेत.
38 नव्या चेहऱ्यांना संधी -
गुजरात उमेदवारांची यादी जाहीर करताना भाजपनं 38 विद्यमान आमदारांची तिकिटे कापली आहे. तर 69 जणांना पुन्हा संधी दिली आहे. म्हणजेच पहिल्या यादीमध्ये भाजपनं 38 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
टीप- सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत, त्यामुळे यातून एबीपी न्यूज अथवा एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी हे साप्ताहिक सर्वेक्षण केले आहे. यासाठी गुजरातमध्ये 2,666 लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. सर्वेक्षणातील त्रुटींचं मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के आहे.