एक्स्प्लोर

Goa Exit Poll 2022 : गोव्यात त्रिशंकू स्थिती, कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नाही

Goa Exit Poll 2022 :  ABP Cvoter यांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये गोव्यात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही, असा अंदाज सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

ABP Cvoter Exit Poll LIVE : लोकसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र त्याआधी  एक्झिक्ट पोलच्या माध्यमातून या निकालांचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.  ABP Cvoter यांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये गोव्यात  कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. भाजपला 13 ते 17 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर कॉंग्रेसला 12 ते 16  जागा मिळणार असल्याचे  या सर्व्हेच्या माध्यमातून समोर आले आहे.

गोव्यात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही

Exit poll नुसार गोव्यात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही. या अटीतटीच्या सामन्यात भाजप पुढे  आहे.  भाजपसमोर गोव्यात  कॉंग्रेस, आम आदमी पक्षाचे आव्हानआहे. टीएमसी गोव्यात पहिल्यांदा लढत आहे. 40 जागा असणाऱ्या  गोव्यात 2017 साली भाजपच्या खात्यात 13 जागा आल्या होत्या. या वर्षी गोव्यात भाजपला 13 ते 17 जागा मिळण्याचा अंदाज आहे.  तर कॉंग्रेसला 12 ते 16 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  तर आपला 1 ते 5, मगोपला 5 ते 9 आणि इतरांना 0 ते दोन जागा मिळण्याची शक्याता आहे. 

Goa Exit Poll 2022  : गोव्यात त्रिशंकू स्थिती, कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नाही

गोव्यात विधानसभेच्या 40 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत भाजपाला आवाहन देण्यासाठी काँग्रेस सोबतच शिवसेना आणि तृणमूल काँग्रेस आपल्या पूर्ण ताकदीने निवडणूक रिंगणात उतरली आहे. गोव्यात एकाच टप्प्यात पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत 75.29 टक्के लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. 

Goa Exit Poll 2022  : गोव्यात त्रिशंकू स्थिती, कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नाही

एक्झिट पोल मेथॉडोलॉजी काय?

सध्याच्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष आणि अंदाज C-Voter एक्झिट पोल/पोस्ट पोल मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या दिवसानंतर राज्यभरातील 18 वर्षावरील व्यक्तींच्या मुलाखतींवर आधारित आहेत. सर्व मतदारांनी दिलेले तपशील, माहिती, अंदाज त्या दिवसावर आधारीत आहेत. राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात डेटा जमा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही वेळेस ही संख्या 100 च्या प्रमाणात नाही. आमचा अंतिम डेटा हा राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणातील सामाजिक-आर्थिक स्तराच्या  +/- 1%  प्रमाणात आहे. आम्ही संभाव्य निकालाच्या अगदी सर्वात जवळचा अंदाज वर्तवू शकतो असा आमचा विश्वास आहे.

या सर्वेंसाठी सर्व विधानसभा मतदारसंघातील नमुने घेण्यात आले आहेत. MoE मॅक्रो स्तरावर +/- 3% आणि सूक्ष्म स्तरावर +/- 5%  इतके आहे. विश्लेषणासाठी आम्ही आमच्या अल्गोरिदमचा वापर केला आहे. प्रांतीय आणि विभागीतय मतांचे विश्लेषण करण्यासाठी Split-Voter  घटकाचा वापर केला आहे. याच घटकाचा वापर मतदानाची टक्केवारी, जागा किती मिळू शकतात, याचा अंदाज वर्तवण्यासाठी केला आहे. मिळणार असलेल्या मतांच्या टक्केवारीचा अंदाज आणि मिळणाऱ्या अंदाजित जागा यासाठी अंकगणिताचा शास्त्रीय वापर करण्यात आला आहे. संभाव्य मिळणाऱ्या जागांचा अंदाज वर्तवणे हा सर्वेक्षण विज्ञानाचा भाग नाहीत.

सी वोटर एक्झिट पोलसाठीचा डेटा हा मतदान केल्यानंतर मतदारांकडून घेतला जातो. निवडणूक संपेपर्यंत ही प्रक्रिया सुरू असते. एकाच राज्यासाठी ही मुलाखती घेतल्या जातात. यासाठी सर्व विधानसभा मतदारसंघात यादृच्छिकपणे मतदान केंद्र निवडले जातात. अंदाज योग्य पद्धतीने वर्तवण्यासाठी आम्ही अल्गोरिदम प्रक्रियेचा वापर केला आहे.

सर्वेक्षणासाठी आम्ही यादृच्छिकपणे डेटा जमा केला आहे. जणगणनेनुसार असलेल्या स्थानिक लोकसंख्या, त्यातील वैविध्य आदींचा विचार करण्यात आला आहे. आम्ही  WAPOR कोडचा (World Association of Public Opinion Research) वापर केला आहे. असोसिएशन ऑफ पब्लिक ओपिनियन रिसर्च आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची मार्गदर्शक तत्वे ही आम्ही SOP म्हणून मान्य केली आहेत.

संबंधित बातम्या :

ABP Cvoter Exit Poll : पंजाबचा कौल आप पक्षाला, पाहा कुणाला मिळू शकतात किती जागा?

ABP Cvoter Exit Poll : उत्तराखंडमध्ये भाजप-काँग्रेस चुरशीची लढत, पाहा काय सांगतोय एक्झिट पोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Embed widget