नवी मुंबईत राज ठाकरेंबाबत परप्रांतीय व्यक्तीचं आक्षेपार्ह वक्तव्य, मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला चोप
नवी मुंबईत महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याबद्दल एका परप्रांतीय व्यक्तीने आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. यानंतर मनसेचे पदाधिकारी आक्रमक जालेत.
Navi Mumbai : नुकताच महापालिका निवडणुकांचा (Mahapalika election) निकाल लागला आहे. यामध्ये भाजपला मोठं यश मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी भाजपकडून आनंदोत्सव साजरा केला जात आहे. दरम्यान, अशातच नवी मुंबईत (Navi Mumbai) महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याबद्दल एका परप्रांतीय व्यक्तीने आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्याच्या या वक्तव्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच दिला चोप दिला आहे. कोपरखैरणे इथं ही मारहाण केली आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल एका परप्रांतीय व्यक्तीने आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला चांगलचा चोप दिला आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर परप्रांतीय व्यक्तीने राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करत वाद सोडवल्याचं पाहायला मिळालं.
29 महानगरपालिकांमध्ये भाजपा-शिवसेनेच्या महायुतीने सर्वाधिक जागा जिंकल्या
महानगर पालिका निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. 29 महानगरपालिकांमध्ये भाजपा-शिवसेनेच्या महायुतीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. पालिका निवडणुकीचा निकाल हाती आला असून यामध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. महापालिका निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून 29 पैकी 24 पालिकांवर महायुतीची सत्ता आल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे-पवार आणि काँग्रेसचा धुव्वा उडाला आहे. भाजपने जवळपास 9 महापालिकांमध्ये स्वबळावर सत्ता गाठली. यासोबतच नवी मुंबई पालिका निवडणुकीत भाजपचा झंझावात पाहायला मिळाला असून एकनाथ शिंदेंना धक्का बसला आहे. नवी मुंबईत भाजपचा 65 जागांवर विजय झाला असून शिंदेंची शिवसेना नवी मुंबईत 42 जागांवर विजयी झाली आहे.
मुंबईतही भाजपला मोठं यश
मुंबई महापालिकेवर गेल्या 3 दशकांपासून ठाकरेंच्या शिवसेनेचं नाव राहिलेलं होतं. शिवसेना या निवडणुकीवेळी विभक्त झालेली होती. त्यामुळे दोन शिवसेनांनी मुंबईमहापालिका निवडणूक लढवण्याची ही पहिली वेळ होती. दोन्ही शिवसेनांना आपापली ताकद इथे दाखवायची होती. तर भाजपने देखील सर्वस्व लावलं होतं. तर दुसरीकडे ठाकरे बंधू एक झाले होते. दोन्ही ठाकरे बंधूंनी मराठी अस्मितेचा मुद्दा या निवडणुकीत उपस्थित झाला होता. त्यामुळे ही निवडणूक जास्त महत्त्वाची मानली जात होती. अखेर या निवडणुकीनंतर सर्व चित्र स्पष्ट झालं आहे. भाजपला 89, ठाकरेंच्या शिवसेनेला 65, शिंदेंच्या शिवसेनेला 29, काँग्रेसला 24, एमआयएमला 8, मनसेला 6, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3, समाजवादी पक्षाला 2 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागेवर यश मिळालं.




















