(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Exit Poll vs Opinion Poll: ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय? दोन्हीमध्ये नेमका फरक काय?
Exit Poll vs Opinion Poll: ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय? या दोन्ही पोलमध्ये नेमका काय फरक आहे? याबाबत अनेकदा गफलत होते. तर यामधील फरक आज आपण जाणून घेऊयात...
Exit Poll vs Opinion Poll: निवडणुका म्हटलं की सत्ता कुणाची? कोण निवडून येणार? किती मतांनी निवडून येणार? मुख्यमंत्री कोण होणार? असे अनेक सवाल उपस्थित केले जातात. या प्रश्नांवर अगदी गावगाड्यातल्या पारावरुन ते शहरातल्या पंचतारांकीत हॉटेलांपर्यंत चर्चा होते आणि अंदाज व्यक्त केले जातात. अनेकांचे अंदाज खरे होतात, अनेकांचे चुकतात. अशाच प्रकारे जनतेचा कौल जाणून घेत निवडणुकांच्या पूर्वी पोल घेत कल जाणून घेतले जातात. यात दोन प्रकारचे पोल असतात. एक म्हणजे ओपिनियन पोल आणि दुसरा म्हणजे एक्झिट पोल. आता पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 10 मार्च रोजी मतमोजणीनंतर उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा (Uttar Pradesh, Punjab, Manipur, Uttrakhand, Goa) या पाच राज्यांमध्ये कोणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल, मात्र अंतिम निकाल येण्याआधीच अनेकांनी आपले अंदाजपंचे निकाल मांडायला सुरुवात केली आहे.
मात्र ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय? या दोन्ही पोलमध्ये नेमका काय फरक आहे? याबाबत अनेकदा गफलत होते. तर यामधील फरक आज आपण जाणून घेऊयात...
ओपिनियन पोल मतदानापूर्वी सादर केला जातो, तर एक्झिट पोल हा सर्व टप्प्यांतील मतदान पार पडल्यानंतर. ओपिनियन पोल म्हणजे जनमत चाचणी असते. मतदान होण्यापूर्वी विविध मतदारसंघांमध्ये जाऊन मतदारांचा कल जाणून घेतला जातो. ओपनियन पोल मतदानाच्या आधी घेतल्याने त्याचे निष्कर्ष बदलण्याची शक्यता असते. एक्झिट पोल हा मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर केला जातो.
देशातील पहिला एक्झिट पोल कधी झाला?
राजधानी दिल्लीतील सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (सीएसडीएस)ने केलेला एक्झिट पोल हा देशातील पहिला एक्झिट पोल मानला जातो. दूरदर्शनने 1996 साली देशातला पहिला एक्झिट पोल घेतला होता.
एक्झिट पोल जाहीर करायची वेळ काय?
एक्झिट पोल हा सर्व टप्प्यांतील निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर जाहीर करण्यास परवानगी आहे. त्यानुसार आज, 07 मार्च रोजी संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर केला जाईल. एबीपी माझा आणि सी व्होटरचा सर्व्हे आपण एबीपी माझाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर पाहू शकाल.
लाईव्ह टीव्ही- https://marathi.abplive.com/live-tv
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक– https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha
या ठिकाणी आपण एक्झिट पोलचे अंदाज पाहू शकाल.
एक्झिट पोलचं सर्वेक्षण कसं घेतलं जातं?
मतदानानंतर तात्काळ मतदारांचा कौल विचारुन गोळा केलेली आकडेवारी एक्झिट पोलसाठी वापरली जातो. संबंधित मतदान केंद्रावर किती मतदार आहेत याची माहिती आधीच घेतली गेलेली असते. त्याच्या आधारेच मतदान केंद्रांची निवड करण्यात आलेली असते. मतदान करुन येणारा ठराविक क्रमाकांचा (दहावा, विसावा, पंचविसावा) मतदार सॅम्पल म्हणून निवडला जातो. मतदान करुन आल्यानंतर कोणाला मत दिलं, असा थेट प्रश्न मतदाराला विचारला जातो. मतदारांनी दिलेल्या उत्तराच्या आधारे सर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि संबंधित मतदारसंघातील निकालाचा अंदाज वर्तवला जातो.
एक्झिट पोल करणारी संस्था कोणत्या गोष्टी ध्यानात घेते?
-कोणत्या टप्प्यामध्ये किती टक्के मतदान
-नवमतदारांची संख्या
- मतदारांनी दिलेली माहिती,
- एक्झिट पोल मांडणाऱ्या संस्थांनी मांडलेला निष्कर्ष
- राजकीय विश्लेषकांनी वर्तवलेले अंदाज या सगळ्यातून एक्झिट पोलचे अंदाज बांधले जातात.
इतर महत्वाच्या बातम्या
एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय?
UP Exit Poll 2022: सर्वात मोठा निकाल उत्तरप्रदेशचा! अचूक एक्झिट पोल कधी अन् कुठे?