एक्स्प्लोर

ABP C-Voter Exit Poll 2022: पाच राज्यांच्या निवडणूक निकालाचा अचूक एक्झिट पोल एबीपी माझावर; कधी, कुठे पाहाल?

ABP C-Voter Exit Poll 2022:  10 मार्च रोजी उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा (Uttar Pradesh, Punjab, Manipur, Uttrakhand, Goa) या पाच राज्यांमध्ये कोणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल

ABP C-Voter Exit Poll 2022:  पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 10 मार्च रोजी मतमोजणीनंतर उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा (Uttar Pradesh, Punjab, Manipur, Uttrakhand, Goa) या पाच राज्यांमध्ये कोणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल, मात्र अंतिम निकाल येण्याआधीच अनेकांनी आपले अंदाजपंचे निकाल मांडायला सुरुवात केली आहे. भाजप युपीमध्ये पुन्हा आपली सत्ता स्थापन करणार का? भाजपला एकहाती बहुमत मिळणार का? पंजाबमध्ये कोण बाजी मारणार? असे एक ना अनेक प्रश्न सामान्य मतदारांच्या मनात आहेत.

मतदारांच्या मनातील प्रश्नांना अंधुकशी उत्तरं देणारा किरण म्हणजेच मतदानोत्तर जनमत चाचणी. साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे एक्झिट पोल. एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अचूक अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न केला जातो. एक्झिट पोलमधून तंतोतंत आकडेवारी समोर येत नसली, तरी मतदारांचे प्रश्न तात्पुरत्या स्वरुपात शमतात. कारण एक्झिट पोलमधून वर्तवले जाणारे अंदाज हे बहुतांश वेळा अंतिम निकालाच्या जवळपास जाणारे असतात.

एक्झिट पोल जाहीर करायची वेळ काय?

एक्झिट पोल हा सर्व टप्प्यांतील निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर जाहीर करण्यास परवानगी आहे. त्यानुसार उद्या, 07 मार्च रोजी  संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर केला जाईल. एबीपी माझा आणि सी व्होटरचा सर्व्हे आपण एबीपी माझाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर पाहू शकाल. 

लाईव्ह टीव्ही- https://marathi.abplive.com/live-tv 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक– https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

या ठिकाणी आपण एक्झिट पोलचे अंदाज पाहू शकाल.

एक्झिट पोलचं सर्वेक्षण कसं घेतलं जातं? 

मतदानानंतर तात्काळ मतदारांचा कौल विचारुन गोळा केलेली आकडेवारी एक्झिट पोलसाठी वापरली जातो. संबंधित मतदान केंद्रावर किती मतदार आहेत याची माहिती आधीच घेतली गेलेली असते. त्याच्या आधारेच मतदान केंद्रांची निवड करण्यात आलेली असते. मतदान करुन येणारा ठराविक क्रमाकांचा (दहावा, विसावा, पंचविसावा) मतदार सॅम्पल म्हणून निवडला जातो. मतदान करुन आल्यानंतर कोणाला मत दिलं, असा थेट प्रश्न मतदाराला विचारला जातो. मतदारांनी दिलेल्या उत्तराच्या आधारे सर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि संबंधित मतदारसंघातील निकालाचा अंदाज वर्तवला जातो. 

एक्झिट पोलमध्ये सर्वसाधारणपणे कोणते प्रश्न विचारतात? 

मुख्यमंत्री म्हणून कोणत्या नेत्याला पसंती? विद्यमान मुख्यमंत्र्यांची कामगिरी कशी? कोणत्या पक्षाची कामगिरी समाधानकारक? सत्ताधारी सरकारने केलेल्या कामांबाबत समाधानी आहात? 

एक्झिट पोल करणारी संस्था कोणत्या गोष्टी ध्यानात घेते? 

-कोणत्या टप्प्यामध्ये किती टक्के मतदान 
-नवमतदारांची संख्या
- मतदारांनी दिलेली माहिती, 
- एक्झिट पोल मांडणाऱ्या संस्थांनी मांडलेला निष्कर्ष
- राजकीय विश्लेषकांनी वर्तवलेले अंदाज या सगळ्यातून एक्झिट पोलचे अंदाज बांधले जातात. 

एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल वेगवेगळे का? 

ओपिनियन पोल मतदानापूर्वी सादर केला जातो, तर एक्झिट पोल हा सर्व टप्प्यांतील मतदान पार पडल्यानंतर. ओपिनियन पोल म्हणजे जनमत चाचणी. मतदान होण्यापूर्वी विविध मतदारसंघांमध्ये जाऊन मतदारांचा कल जाणून घेतला जातो. ओपनियन पोल मतदानाच्या आधी घेतल्याने त्याचे निष्कर्ष बदलण्याची शक्यता असते. देशातील पहिला एक्झिट पोल कधी झाला? राजधानी दिल्लीतील सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (सीएसडीएस)ने केलेला एक्झिट पोल हा देशातील पहिला एक्झिट पोल मानला जातो. दूरदर्शनने 1996 साली देशातला पहिला एक्झिट पोल घेतला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वासTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaPM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामनाCM Eknath Shinde, Devendra Fadnavs आणि अजित पवार यांची 'वर्षा' बंंगल्यावर बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
Embed widget