एक्स्प्लोर

एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय?

एबीपीने ज्या सीएसडीएससोबत एक्झिट पोल केला आहे, त्याच सीएसडीएसने (सेंटर फॉर स्टडीज ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज) देशातील पहिला एक्झिट पोला केला होता.

मुंबई : एबीपीने ज्या सीएसडीएससोबत एक्झिट पोल केला आहे, त्याच सीएसडीएसने (सेंटर फॉर स्टडीज ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज) देशातील पहिला एक्झिट पोला केला होता. तेव्हा टी. एन. शेषन निवडणूक आयुक्त होते. हा एक्झिट पोल दूरदर्शनसाठी करण्यात आला होता. एक्झिट पोल कसा असतो? प्रत्येक निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर तुम्ही एक्झिट पोल पाहत असाल. मात्र मतदानोत्तर जनमत चाचणी म्हणजेच एक्झिट पोल नेमका कसा केला जातो, एक्झिट पोल म्हणजे काय, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एक्झिट पोल मतदानाच्या दिवशीच केला जातो. मतदान करुन आल्यानंतर मतदाराला कुणाला मत दिलं हे विचारलं जातं. त्या मतदान केंद्रावर किती मतदार आहेत, याची माहिती अगोदरच घेतलेली असते, त्यानुसार ठराविक मतदार केंद्र निवडली जातात. सांख्यिकी पद्धतीने मतदान करुन येणारा पंधरावा माणूस, विसावा माणूस सॅम्पल म्हणून निवडला जातो. त्याचं विश्लेषण करुन आकडेवारी निश्चित करतात. #ABPEXITPOLL -  गुजरातमध्ये मोदीच, हिमाचलमध्येही मोदी! प्रत्येक मतदारसंघातलं कोणतं मतदान केंद्र निवडायचं हे सांख्यिकी पद्धतीनेच (सॅम्पल सिलेक्शन) ठरवलं जातं. मतदान करुन आल्यानंतर तुमच्यावर पहिला अर्धा तास प्रभाव कायम असतो की, तुम्ही कुणाला मतदान केलंय. त्यामुळे तिथे खरं उत्तर दिलं जातं, याला मानसशास्त्रीय आधार असल्याचं मानलं जातं. ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलमध्ये फरक काय? मतदानापूर्वी सादर केला जातो तो ओपिनियन पोल म्हणजे जनमत चाचणी असते, तर मतदानानंतर होणाऱ्या मतदानोत्तर चाचणीला एक्झिट पोल म्हणतात. मतदानापूर्वी विविध मतदारसंघामध्ये जाऊन मतदारांकडून प्रश्नावली भरुन घेऊन त्यांचा कल जाणून घेतला जातो, त्याला ओपिनियन पोल म्हणतात. ओपिनियन पोलचे अंदाज बदलू शकतात, कारण तो मतदानापूर्वी घेतला जातो. तर एक्झिट पोल हा निकालाच्या जवळ जाणारा असू शकतो, कारण तो मतदान केल्यानंतर काही वेळातच जाणून घेतला जातो. भारतातला पहिला एक्झिट पोल कसा झाला होता? भारतात 1996 साली पहिला एक्झिट पोल करण्यात आला. याला प्रशासनानेही पुरेपूर सहकार्य केलं होतं. एका ठराविक वारंवारतेने येणाऱ्या ठराविक मतदाराला सांगितलं जायचं, की तुमच्यासाठी आणखी एक मतदान आहे. त्यानुसार त्यांच्याकडून डमी बॅलेट पेपरवर शिक्का मारुन घेतला जायचा. अगोदर ज्याला मतदान केलं, त्यालाच इथेही करा असं सांगितलं जायचं. अशा पद्धतीने पहिला एक्झिट पोल केला गेला. देशातील आघाडीचे निवडणूक तज्ञ योगेंद्र यादव यांचा पहिल्या एक्झिट पोलमध्ये मोलाचा वाटा होता. संबंधित बातम्या :

गुजरातचा रणसंग्राम : सर्व चॅनल्सचे एक्झिट पोल एकाच ठिकाणी

हिमाचलमध्ये भाजप बहुमताने सत्तेत, चाणक्यचा एक्झिट पोल

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
सरकार घाबरलंय, आंदोलन शक्तीशाली! 40 हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य 
सरकार घाबरलंय, आंदोलन शक्तीशाली! 40 हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य 
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget