एक्स्प्लोर
Advertisement
शिवसेनेचा आमदार फोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याचंच डोकं फुटेल : दिलीप लांडे
शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत घरोबा करण्याचं पक्क केल्यानंतर भाजपने ऑपरेशन लोटस हाती घेतल्याचं बोललं जातं आहे. त्यासाठी आमदार फोडाफोडीची, घोडेबाजाराची चर्चा आहे.
मुंबई : शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी आमदार फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना इशारा दिला आहे. "शिवसेनेचा आमदार फोडणं तसं शक्य नाही. पण जर कोणी आमदार फोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचंच डोकं फुटेल, असं वक्तव्य दिलीप लांडे यांनी केलं आहे. 'द रिट्रीट' हॉटेलमधून आपल्या मतदारसंघात परत जाताना दिलीप लांडे यांनी हे वक्तव्य केलं.
शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत घरोबा करण्याचं पक्क केल्यानंतर भाजपने ऑपरेशन लोटस हाती घेतल्याचं बोललं जातं आहे. कर्नाटकात राबवलेला पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्याचा भाजपचा इरादा असल्याचं म्हटलं जात आहे. त्यासाठी आमदार फोडाफोडीची, घोडेबाजाराची चर्चा आहे. शिवाय आमदार फुटीच्या भीतीने शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना मालाडच्या रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवलं होतं. तर काँग्रेसचे आमदार जयपूरमध्ये आहेत.
अविश्वासामुळे हॉटेलमध्ये ठेवलं नाही!
आमदार फोडण्याविषयी दिलीप लांडे म्हणाले की, "शिवसेनेचा आमदाराना फोडणं तसं शक्य नाही. पण जर कोणी आमदार फोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचंच डोकं फुटेल. परंतु त्यासाठी हॉटेलमध्ये ठेवलं नव्हतं. राष्ट्रपती राजवट लागण्यापूर्वी कधीही सत्ता स्थापनेसाठी बोलावतील. त्यामुळे सर्व आमदार जवळ असणं गरजेचं असतं. त्यामुळे आम्हीच सांगितलं, साहेब लांबून येणं अवघड आहे, आम्हाला इथेच ठेवा, म्हणून आम्हाला इथे जवळ ठेवलं. 7.30 वाजता पोहोचणं गरजेचं होतं. मग अशावेळी वेळेत राज्यपालांकडे पोहोचण्यासाठी आम्हाला जवळ ठेवलं होतं, अविश्वासामुळे नाही."
आपापल्या मतदारसंघात परतण्याचे आदेश
गेल्या अनेक दिवसांपासून मालाडच्या रिट्रीट हॉटेलात मुक्कामी असलेल्या शिवसेना आमदारांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपापल्या मतदारसंघात परतण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे काल रात्रीपासून आमदार परतायला सुरुवात झाली आहे. तरी, या आमदारांना 17 नोव्हेंबरला म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीला त्यांच्या स्मृतिस्थळावर हजर राहण्यास सांगितलं आहे.
याबद्दल दिलीप लांडे म्हणाले की, "नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांचा शिवसेनेवर विश्वास आहे. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी, त्याच्या अडचणीच्या वेळी प्रत्येक शिवसैनिकाने त्याच्या मदतीला जाण्याची गरज आहे. आम्ही आमदार खेडेगावातून आलो आहोत, आम्ही स्वत: शेतकरी आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी, सर्वांनी आपापल्या विभागात जाऊन, शेतकऱ्याला मदत करणं आणि सोबत राहणं गरजेचं असल्याचा आदेश शिवसेना पक्षप्रमुखांनी दिला आहे."
संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बीड
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement