UPSC Interview Questions : फाशी दिल्यानंतर गुन्हेगाराच्या मृतदेहाचे काय केले जाते? जाणून घ्या UPSC मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे
UPSC Interview Questions : UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
UPSC Interview Questions : अनेक उमेदवार वर्षानुवर्षे यूपीएससी परीक्षेची तयारी करतात. असे असूनही परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही. जर तुम्हाला आयएएस (IAS) लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची असावी. मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्क क्षमता तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.
यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो. परंतु, उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
प्रश्न - फाशी दिल्यानंतर आरोपीच्या मृतदेहाचे काय केले जाते?
उत्तर - गुन्हेगाराला फाशी दिल्यानंतर गुन्हेगाराला कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दोन तास फासावर लटकवले जाते. दोन तासानंतर डॉक्टर तिथे येतात आणि मृतदेह तपासतात. वैद्यकीय पथकाने त्याला मृत घोषित केल्यानंतर त्याचे पोस्टमॉर्टम करण्यात येते.
प्रश्न - एका महिलेला पाहून राजेश म्हणतो ती माझ्या पत्नीच्या नवऱ्याच्या आईची मुलगी आहे, राजेशचा त्या महिलेशी संबंध कसा?
उत्तर - ती महिला राजेशची बहीण आहे.
प्रश्न - जिभेने नव्हे तर पायाने सर्व काही चाखणारी अशी कोणता पक्षी आहे?
उत्तर - फुलपाखरू
प्रश्न - तो कोण आहे ज्याला बुडताना पाहून कोणीही वाचवायला येत नाही?
उत्तर - सूर्यास्ताला पाहून कोणीही त्याला वाचवायला येत नाही.
प्रश्न - अशी कोणती गोष्ट आहे जी खायला विकत घेतली जाते पण पेरली जात नाही?
उत्तर - जेवणाचे ताट पेरले जात नाही.
प्रश्न - कोणता देश आहे जेथे सार्वजनिक वाहतूक मोफत आहे?
उत्तर - लक्झेंबर्ग हा देश आहे जिथे वाहतूक पूर्णपणे मोफत आहे.
प्रश्न - जेवढे जास्त स्वच्छ केले जाईल तेवढे काळे होईल असे काय आहे?
उत्तर - ब्लॅक बोर्ड जितका जास्त स्वच्छ केला जाईल तितका तो काळा होतो.
प्रश्न - जगातील एकमेव असा देश कोणता आहे जिथे एकही साप आढळत नाही?
उत्तर - न्यूझीलंड हा जगातील असा देश आहे जिथे एकही साप आढळत नाही.
महत्वाच्या बातम्या :
- UPSC Interview Questions : महिलांचा आयक्यू कमी असतो का? युपीएससीमध्ये विचारण्यात येणाऱ्या तिरकस प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
- Exam: अशी कोणती वस्तू आहे जी कोरडी असताना 1 किलो, ओली झाली तर 2 किलो आणि जळाली तर 3 किलो होते?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI