एक्स्प्लोर

UGC NET June 2024 : तयारीला लागा! UGC NET परीक्षेची अर्जप्रक्रिया लवकरच सुरू होणार, वाचा नवं अपडेट

UGC NET June 2024 : UGC NET 2024 साठी नोंदणी प्रक्रिया पुढील आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.अशी माहिती यूजीसीचे अध्यक्ष ममिदला जगदीश कुमार यांनी दिली आहे.

UGC NET June 2024 : UGC NET ची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency) अर्थात UGC NET 2024 साठी नोंदणी प्रक्रिया पुढील आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. अशी माहिती यूजीसीचे अध्यक्ष ममिदला जगदीश कुमार यांनी दिली आहे. ते म्हणाले की, नोंदणी प्रक्रिया एकदा सुरु झाल्यानंतर उमेदवार यूजीसी नेटच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) चे अध्यक्ष ममिदला जगदीश कुमार यांनी बुधवारी जाहीर केले की जून 2024 सत्रासाठी UGC राष्ट्रीय पात्रता चाचणी (UGC NET 2024) नोंदणी पुढील आठवड्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे. एकदा अर्जप्रक्रिया सुरु झाल्यानंतर उमेदवार यूजीसी नेटच्या ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकतात.  

UGC NET जून 2024 साठी नोंदणी कशी करावी? (How To Apply)

स्टेप 1 : सर्वात आधी तुम्हाला ugcnet.nta.nic.in. या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. 

स्टेप 2 : यानंतर होम पेजवरील नोंदणी लिंकवर क्लिक करा.

स्टेप 3 : लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला अर्ज आणि फी भरावी लागेल.  

स्टेप 4 : अर्ज फी भरल्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा.

स्टेप 5 : त्यानंतर तुमचा अर्ज डाऊनलोड करा आणि तुम्हाला हवी असल्यास त्याची प्रिंटआउट काढा. जेणेकरून भविष्यात ही प्रिंट आऊट तुम्हाला उपयोगी पडेल. 

वर्षातून दोनदा होते UGC NET परीक्षा

UGC NET परीक्षा वर्षातून दोनदा म्हणजेच जून आणि डिसेंबरमध्ये घेतली जाते. NET वर्षातून दोनदा जून आणि डिसेंबरमध्ये घेतली जाते. सध्या NET स्कोअर (a) कनिष्ठ संशोधन फेलोशिप (JRF) पुरस्कार आणि (b) पदव्युत्तर पदवी असलेल्यांसाठी सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्तीसाठी पात्रता म्हणून वापरला जातो.

गेल्या वर्षी 9 लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती

गेल्या वर्षी, देशभरातील 292 शहरांमधून 9,45,918 उमेदवारांनी नोंदणी केली होती आणि 6,95,928 उमेदवारांनी UGC NET डिसेंबर 2023 च्या परीक्षेला बसले होते. ही परीक्षा 6 डिसेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान घेण्यात आली होती. डिसेंबर 2023 च्या परीक्षेचा निकाल यापूर्वी 10 जानेवारी रोजी जाहीर होणार होता. पण, काही कारणांमुळे हा निकाल 17 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर तांत्रिक अडचणींमुळे हा निकाल जाहीर करण्यास आणखी उशीर झाला होता. 

महत्त्वाच्या बातम्या :

ED मध्ये नोकरी कशी मिळते? पात्रता काय आणि पगार किती मिळतो? A to Z माहिती वाचा एका क्लिकवर...

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget