Job Majha: नोकरीच्या शोधात आहात? या ठिकाणी आहेत भन्नाट ऑफर
Job Majha : अहमदनगर महावितरण आणि एअर इंडिया एअरपोर्ट सर्विस लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी पात्रता काय आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची सर्व माहिती खालीलप्रमाणे,
Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
अहमदनगर महावितरण आणि एअर इंडिया एअरपोर्ट सर्विस लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी पात्रता काय आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची सर्व माहिती खालीलप्रमाणे,
महावितरण, अहमदनगर
पोस्ट – लाईनमन, कम्प्युटर ऑपरेटर
एकूण जागा – ३२०
शैक्षणिक पात्रता – १०वी उत्तीर्ण, ITI, किमान अनुभव महत्वाचा आहे.
वयोमर्यादा – १८ ते ३० वर्ष
नोकरीचं ठिकाण – अहमदनगर
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज कऱण्याची शेवटची तारीख – २३ मार्च २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता - अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशन रोड, अहमदनगर – ४१४००१
अधिकृत वेबसाईट - www.mahatransco.in
एअर इंडिया एअरपोर्ट सर्विस लिमिटेड (AIASL)
विविध पदांच्या २७७ जागांसाठी ही भरती निघाली आहे.
पहिली पोस्ट – डेप्युटी टर्मिनल मॅनेजर
एकूण जागा – १
शैक्षणिक पात्रता – पदवीधर, १८ वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा – ५५ वर्षांपर्यंत
दुसरी पोस्ट – ड्युटी ऑफीसर रॅम्प
एकूण जागा – ३
शैक्षणिक पात्रता – पदवीधर, १२ वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा – ५० वर्षांपर्यंत
तिसरी पोस्ट – ऑफीसर ऍडमीन
एकूण जागा – ४
शैक्षणिक पात्रता – MBA (एचआर)
वयोमर्यादा – ३५ ते ४० वर्ष
चौथी पोस्ट – ऑफीसर फायनॅन्स
एकूण जागा – ५
शैक्षणिक पात्रता – ICA (इंटर चार्टर्ड अकाऊंटंट)/ MBA (फायनॅन्स)
वयोमर्यादा – ३० ते ३५ वर्ष
पाचवी पोस्ट – ज्युनियर एक्झिक्युटिव्ह टेक्निकल
एकूण जागा – २
शैक्षणिक पात्रता – मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी
वयोमर्यादा – २८ ते ३३ वर्ष
सहावी पोस्ट – ज्युनियर एक्झिक्युटिव्ह
एकूण जागा – ८
शैक्षणिक पात्रता- पदवीधर, ९ वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा – ३५ ते ४० वर्ष
सातवी पोस्ट – कस्टमर एजंट
एकूण जागा – ३९
शैक्षणिक पात्रता – पदवीधर / IATA डिप्लोमा
वयोमर्यादा – २८ ते ३३ वर्ष
आठवी पोस्ट – रॅम्प सर्विस एजंट
एकूण जागा- २४
शैक्षणिक पात्रता – मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन /इलेक्ट्रॉनिक्स /ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा
वयोमर्यादा – २८ ते ३३ वर्ष
नववी पोस्ट – हँडीमॅन
एकूण जागा – १७७
शैक्षणिक पात्रता – १०वी उत्तीर्ण, स्थानिक, हिंदी, इंग्रजी भाषेचं ज्ञान आवश्यक
वयोमर्यादा – २८ ते ३३ वर्ष
ईमेल आयडी - hrhq.aiasl@airindia.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ मार्च २०२२
अधिकृत वेबसाईट - www.aiasl.in
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI