(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NEET PG समुपदेशन 'या' तारखेपासून सुरु होण्याची शक्यता, लवकरच जारी होणार स्कोअरकार्ड
NEET PG 2023 Counselling : नीट पीजी काऊंसेलिंग 15 जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे. काही दिवसांत स्कोअरकार्डही प्रसिद्ध करण्यात येईल.
NEET PG, MDS Counselling Schedule 2022 : नीट पीजी परीक्षेचा (NEET PG Result 2023) निकाल लागला आहे. त्यानंतर आता वैद्यकीय समुपदेशन समितीकडून (MCC) NEET PG साठी समुपदेशनाचं (NEET PG Counselling 2023) वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल आहे. नीट पीजी परीक्षेमध्ये पास झालेले परीक्षार्थी आता नीट पीजी काऊंसेलिंगची वाट पाहत आहेत. नीट पीजी समुपदेशन म्हणजेच NEET PG काऊंसेलिंग प्रक्रिया 15 जुलैपासून सुरु होण्याची शक्यता आहे. काही दिवसांत स्कोरकार्डही वेबसाईटवर उपलब्ध करण्यात येईल. उमेदवारांना संपूर्ण वेळापत्रक आणि स्कोरकार्ड MCC वेबसाईट mcc.nic.in वर पाहता येणार आहे.
नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेसने (NBE-National Board of Examination) यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. दरम्यान, न्यायालयीन सुनावणीदरम्यान, राष्ट्रीय परीक्षा मंडळाने सांगितलं होतं की, 15 जुलै 2023 पासून समुपदेशन सुरु केलं जाईल. यासोबतच स्कोअरकार्डही लवकरच जारी करण्यात येणार आहेत.
समुपदेशन कधी होणार?
गेल्या महिन्यात, NEET PG स्थगिती याचिकेच्या सुनावणीदरम्यान, केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की, राष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBE) 15 जुलैपासून NEET PG समुपदेशन सुरु करण्याच्या तयारीत आहे. मार्चमध्ये जरी एनईईटी पीजी परीक्षा झाली तरी 11 ऑगस्टपूर्वी समुपदेशन सुरु होणार नाही, असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं. त्याला उत्तर देताना NBE कडून हे सांगण्यात आलं. त्यामुळे 15 जुलैपासून समुपदेशन सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
'या' तारखेपासून स्कोअरकार्ड डाऊनलोड करा
NEET PG परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. आता समुपदेशनाची वेळ जवळ आली आहे आणि त्याआधी प्रत्येक परीक्षार्थीचं स्कोअरकार्डही (Scorecard) जारी केलं जाईल. 25 मार्चला स्कोअरकार्ड जारी करण्यात येण्याची शक्यता आहे.
समुपदेशनासाठी करा अर्ज
पास झालेल्या परीक्षार्थींना आता NEET PG समुपदेशनासाठी अर्ज करावा लागेल. परीक्षार्थी 50 टक्के ऑल इंडिया कोट्यातील जागांसाठी वैद्यकीय समुपदेशन समितीच्या MCC, mcc.nic.in. या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करु शकतात.
कसा होता यंदाचा कट ऑफ?
यावर्षी MD, MS, DNB आणि डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी NEET PG परीक्षेचा कट ऑफ (Cut Off) पुढीलप्रमाणे होता. जनरल आणि EWS श्रेणीसाठी 291, जनरल आणि PWBD उमेदवारांसाठी 274 आणि SC, ST आणि OBC उमेदवारांसाठी 257 कट ऑफ होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI