एक्स्प्लोर

NEET Admit Card : नीट परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड आज रिलिज होण्याची शक्यता

NTA NEET Admit Card Release: नॅशनल टेस्टिंग एजेंसीकडून घेतली जाणारी NEET 2020 परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड आज रिलिज केली जाण्याची शक्यता आहे. ही परीक्षा 13 सप्टेंबर 2020 रोजी देशातील विविध शहरांमधील परीक्षा केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे.

नवी दिल्ली: देशात होत असलेल्या विरोधाला डावलून नीट आणि जेईई (NEET and JEE) मुख्य परीक्षा आपल्या निर्धारित वेळेतच होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजेंसीकडून घेतली जाणारी NEET 2020 परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड आज रिलिज केली जाण्याची शक्यता आहे. ही परीक्षा 13 सप्टेंबर 2020 रोजी देशातील विविध शहरांमधील परीक्षा केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं नीट परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची संख्या 2846 वरुन वाढवून 3,843 केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एनटीए आज नीट यूजी परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड रिलिज करु शकते.  या परीक्षेसाठी सर्व परीक्षार्थिंना भारत सरकारच्या गृह मंत्रालय आणि राज्य सरकारकडून दिलेल्या नियमांचं पालन करने गरजेचं आहे. JEE NEET Exam Center List: जेईई-नीट परीक्षांसाठी सेंटर्स वाढवले, राज्यनिहाय सेंटर्सची घोषणा परीक्षार्थिंना परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरु होण्याआधी कमीत कमी दोन तास आधी पोहोचणे आवश्यक आहे. तसेच दोन विद्यार्थ्यांमध्ये 6 फुटांचं अंतर ठेवलं जावं, पाण्याची बॉटल स्वता आणावी तसेच सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेतली जाणार आहे.

परीक्षेसाठी सेंटर्स वाढवले

जेईई आणि नीट परीक्षांसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्यनिहाय सेंटर्सची लिस्ट घोषित केली आहे. शिक्षण मंत्रालयाकडून घोषित केलेल्या लिस्टमध्ये जेईई परीक्षेसाठी सेंटर्स 570 वरुन वाढवून 660 केले आहेत तर  नीट परीक्षेसाठी सेंटर्स 2846 वरुन वाढवून 3843 केली आहेत.

जेईई मुख्य परीक्षेसाठी नंबर ऑफ शिफ्ट्सही वाढवल्या

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की, जेईई परीक्षा एक ते 6 सप्टेंबर दरम्यान होईल आणि नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. जेईई मुख्य परीक्षांसाठी नंबर ऑफ शिफ्ट्स देखील वाढवल्या आहेत. आधी या परीक्षेसाठी आठ शिफ्ट निश्चित केल्या होत्या. आता त्या वाढवून 12 केल्या आहेत.

कोरोनामुळे जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकला, सोनू सूदची मागणी

जेईई मुख्य परीक्षांसाठी अॅडमिट कार्ड देखील रिलिज करण्यात आली आहेत. नीट 2020 परीक्षांसाठी देखील अॅडमिट कार्ड या आठवड्यात रिलिज होण्याची शक्यता आहे. एनटीएकडून अॅडमिट कार्ड रिलिज करतेवेळी सांगण्यात आलं होतं की, जवळपास 99 टक्के विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेली परीक्षा केंद्रं देण्यात आली आहेत.

जेईई मेन्स आणि नीट परीक्षा 2020 टाळणं शक्य नाही असं नॅशनल टेस्टिंग एजन्सीने स्पष्ट केलं आहे. येत्या 13 सप्टेंबरला नीट परीक्षा पार पडणार आहे. मात्र अजूनही ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली जात आहे. मात्र आता कोणत्याही परिस्थितीत परीक्षा जास्त टाळू शकत नाही असं सरकारने स्पष्ट केलं आहे. एनटीएने परीक्षा सेंटर इत्यादींच्या बाबतीत आधीच विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. अॅडमिट कार्ड रिलीज झाल्यानंतर ntaneet.nic.in या वेबसाईटवरून हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येणार आहे.

NEET JEE 2020 | मोठा निर्णय... 'नीट, जेईई परीक्षा वेळेतच', परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

सुप्रीम कोर्टाने कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर नीट आणि जेईईच्या परीक्षा स्थगित करण्याची याचिका फेटाळली आहे. कोरोना व्हायरसच्या महामारीतही जनजीवन सुरु आहे. तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या निर्णयामध्ये दखल देऊन विद्यार्थ्यांचं करिअर धोक्यात टाकणार नाही, असं कोर्टाने म्हटलं.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नीट आणि जेईईच्या परीक्षांना दोनदा स्थगिती देण्यात आली आहे. आधी या परीक्षा मे महिन्यात नियोजित होत्या. त्यानंतर ही परीक्षा जुलै महिन्यात पार पडणार होती. मात्र कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्याने जुलै महिन्यातली परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. आता जेईई मेन परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर रोजी आणि नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pune Drugs Video Exclusive : पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन, 2 तरुणींचा धक्कादायक व्हिडीओBhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबई बैठक संपन्न! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
K P Patil : 'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
Embed widget