NEET UG 2022 Answer Key : NTA द्वारे आज संध्याकाळी 7 वाजता जाहीर होणार NEET UG परीक्षेची उत्तरपत्रिका; 'या' सोप्या पद्धतीने डाऊनलोड करा
NEET UG 2022 Answer Key : NEET UG 2022 ची उत्तरपत्रिका (Answer Key) नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे आज संध्याकाळी 07 वाजता प्रसिद्ध केली जाईल.
![NEET UG 2022 Answer Key : NTA द्वारे आज संध्याकाळी 7 वाजता जाहीर होणार NEET UG परीक्षेची उत्तरपत्रिका; 'या' सोप्या पद्धतीने डाऊनलोड करा neet 2022 answer key to be released today by 7 pm on neet nta nic in website marathi news NEET UG 2022 Answer Key : NTA द्वारे आज संध्याकाळी 7 वाजता जाहीर होणार NEET UG परीक्षेची उत्तरपत्रिका; 'या' सोप्या पद्धतीने डाऊनलोड करा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/23/d075008f8b5c80922b8f929139d93cfc1661238315218358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
NEET UG 2022 Answer Key : NTA द्वारे यावर्षी NEET UG 2022 परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे आज संध्याकाळी 07:00 वाजता NEET UG 2022 परीक्षेची उत्तरपत्रिका (Answer Key) प्रसिद्ध केली जाईल. उत्तर पत्रिका तपासण्यासाठी उमेदवाराला अधिकृत संकेतस्थळाला (Website) neet.nta.nic.in भेट द्यावी लागेल. उमेदवार या संकेतस्थळावरून उत्तर पत्रिका डाऊनलोड देखील करू शकतात. परीक्षेच्या उत्तरपत्रिके बरोबरच प्रश्नपत्रिका देखील NTA द्वारे उपलब्ध करून दिली जाईल. उत्तरपत्रिका प्रसिद्ध झाल्यानंतर, उमेदवारांना प्राथमिक विषयावर आक्षेप घेण्याची संधी मिळेल. उमेदवारांनी आक्षेप घेतलेल्या प्रश्नांचा सोक्षमोक्ष लागल्यानंतरच निकाल जाहीर केला जाईल. यावर्षी 18 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी NEET UG 2022 परीक्षा दिली होती. ही परीक्षा 17 जुलै 2022 रोजी घेण्यात आली होती.
NEET UG 2022 Answer Key : या सोप्या पद्धतीने उत्तरपत्रिका डाऊनलोड करा
1. सर्वात आधी उमेदवारांनी nta.nic.in या NEET च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
2. त्यानंतर उमेदवारांनी उत्तरपत्रिका या लिंकवर क्लिक करावे.
3. आता उमेदवार अर्ज क्रमांक आणि जन्मतारीखचे अपडेट्स टाकू शकतात.
4. नंतर उमेदवारांनी सबमिट या ऑप्शनवर क्लिक करावे.
5. आता उमेदवार उत्तरपत्रिता डाऊनलोड करू शकतात.
6. त्यानंतर उमेदवारांनी उत्तरपत्रिकेची प्रिंट घ्यावी.
NEET UG 2022 Answer Key : आक्षेप कसा नोंदवावा?
1. सर्वात आधी उमेदवारांनी nta.nic.in या NEET च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
2. त्यानंतर उमेदवारांनी उत्तरपत्रिका या लिंकवर क्लिक करावे.
3. त्यानंतर उमेदवारांनी लॉगिन तपशील टाकून सबमिट या ऑप्शनवर क्लिक करावे.
4. आता उमेदवारांनी कोणत्या प्रश्नासाठी आक्षेप घ्यायचा आहे ते निवडावे.
5. शेवटी उमेदवारांनी आक्षेप शुल्क भरून सबमिट या ऑप्शनवर क्लिक करावे.
दरवर्षी NEET UG परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची परीक्षा असून आज संध्याकाळी 7 वाजता या परीक्षेची उत्तरपत्रिका जाहीर होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- CBSE Exam 2022: सीबीएसईच्या 10वी आणि 12वीच्या कंपार्टमेंट परीक्षा 23 ऑगस्टपासून होणार, या गोष्टी लक्षात ठेवा
- JEE Advanced 2022 Exam: JEE Advanced परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' तारखेला जारी होणार, जाणून घ्या
- 11th Admission: अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी उद्यापासून, दुसऱ्या फेरीअखेर 20,587 जागांवर प्रवेश
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)