CBSE Exam 2022: सीबीएसईच्या 10वी आणि 12वीच्या कंपार्टमेंट परीक्षा 23 ऑगस्टपासून होणार, या गोष्टी लक्षात ठेवा
CBSE Exam 2022 : CBSE कंपार्टमेंट परीक्षा 2022 चे प्रवेशपत्र फक्त शाळांकडून डाउनलोड करता येईल. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळांमधून कंपार्टमेंट परीक्षा 2022 चे प्रवेशपत्र मिळवावे.
CBSE Exam 2022 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) 23 ऑगस्टपासून कंपार्टमेंट परीक्षा घेणार आहे. इयत्ता 10 वी कंपार्टमेंट परीक्षा 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट 2022 या कालावधीत आणि 12वीची कंपार्टमेंट परीक्षा 23 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. ही परीक्षा सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 या वेळेत होणार आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 15 मिनिटे देण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळांमधून प्रवेशपत्र मिळवावे
CBSE कंपार्टमेंट परीक्षा 2022 चे प्रवेशपत्र फक्त शाळा प्राधिकरणाद्वारे डाउनलोड करता येईल. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळांमधून कंपार्टमेंट परीक्षा 2022 चे प्रवेशपत्र मिळवावे. प्रवेशपत्र नसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही. यावर्षी सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेत 92.71 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 94.4 टक्के विद्यार्थी दहावीत यशस्वी झाले आहेत. CBSE ने यावर्षीच्या 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल 22 जुलै 2022 रोजी जाहीर केला होता.
विद्यार्थ्यांनो.. या गोष्टी लक्षात ठेवा
-इयत्ता 10वी आणि 12वी च्या कंपार्टमेंट परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे -
-विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर आणि परीक्षेदरम्यान कोविड-19 पासून बचाव करण्याच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले पाहिजे.
-परीक्षेदरम्यान विद्यार्थी तोंडाला मास्क लावावा.
- याशिवाय परीक्षा केंद्रावर सॅनिटायझर वापरा आणि सामाजिक अंतर पाळा.
-परीक्षा केंद्रात उमेदवारांना स्मार्टफोन, स्मार्टघड्याळे यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे सोबत ठेवता येणार नाहीत.
प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?
1: CBSE कंपार्टमेंट परीक्षा 2022 प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, अधिकृत साइट cbse.gov.in किंवा परिक्षा संगम पोर्टलला भेट द्या.
2: आता शाळांसाठी परीक्षा संगम पोर्टल अंतर्गत, 'परीक्षापूर्व उपक्रम' या लिंकवर क्लिक करा.
3: त्यानंतर अॅडमिट कार्ड कंपार्टमेंट परीक्षा 2022 साठी केंद्र सामग्रीच्या लिंकवर क्लिक करा.
4: त्यानंतर इयत्ता 9वी आणि 11वीच्या नोंदणीच्या वेळी तयार केलेला ऑनलाइन यूजर आयडी टाका.
5: त्यानंतर सर्व प्रवेशपत्रे डाउनलोड करा.
6: शेवटी सर्व प्रवेशपत्रांची प्रिंट काढा.
जेईई अॅडव्हान्स परीक्षाही होणार
जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या JEE परीक्षेची प्रवेशपत्रे लवकरच जारी केली जातील. जे विद्यार्थी अधिकृत साइट jeeadv.ac.in वर जाऊन डाउनलोड करू शकतील. JEE Advanced 2022 (JEE Advanced 2022) परीक्षा 28 ऑगस्टला होणार आहे. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. पेपर 1 हा सकाळच्या शिफ्टमध्ये सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत होईल. तर पेपर 2 दुपारच्या शिफ्टमध्ये घेण्यात येईल. ही परीक्षा दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
JEE Advanced 2022 Exam: JEE Advanced परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' तारखेला जारी होणार, जाणून घ्या
Aurangabad: विद्यार्थ्यांवर आली काठीला लटकून नदी ओलांडण्याची वेळ; पुरात गेला पूल वाहून
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI