Nagpur Ward Delimitation: एका विशिष्ट राजकीय पक्षाला फायदा पोहोचवण्यासाठी प्रभाग रचना केली का? नागपूर महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेच्या सुनावणीवेळी सवाल
Nagpur Ward structure : नागपूर महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचने संदर्भात विविध राजकीय पक्ष, राजकीय कार्यकर्ते आणि सामान्य मतदारांनी नोंदवलेल्या हरकती व आक्षेपांवर सुनावणी सध्या सुरू झाली आहे.

Nagpur Ward structure : नागपूर महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचने संदर्भात विविध राजकीय पक्ष, राजकीय कार्यकर्ते आणि सामान्य मतदारांनी नोंदवलेल्या हरकती व आक्षेपांवर सुनावणी सध्या सुरू झाली आहे. वरिष्ठ सनदी अधिकारी श्रावण हार्डीकर यांच्या अध्यक्षतेत ही सुनावणी होत आहे. नागपूर महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचने संदर्भात एकूण 115 हरकती व आक्षेप नोंदवण्यात आले होते, त्यापैकी प्रभागाच्या सीमेशी संबंधित 59 हरकती व आक्षेप आजच्या सुनावणीसाठी ग्राह्य धरण्यात आल्या आहे.
दरम्यान, प्रभागांची सीमा निश्चित करताना मोठे रस्ते, नदी नाले, रेल्वे ट्रॅक याकडे दुर्लक्ष करत छोट्या गल्लीबोळ प्रभागाच्या सीमा म्हणून निश्चित करण्यात आल्याबद्दल आक्षेप नोंदवण्यात आले आहे. तर काही आक्षेपकर्त्यांनी एका विशिष्ट राजकीय पक्षाला फायदा पोहोचवण्यासाठी ही प्रभाग रचना केल्याचे आरोप भाजपचं नाव न घेता केले आहे. त्यामुळे सर्वांच समाधान होईल, अशी प्रभाग रचना करणे महापालिका प्रशासनासाठी मोठे आव्हानात्मक काम करण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगर पालिकेसाठी जाहीर प्रारूप आराखड्यावर उद्या पासून सुनावणी
मुंबईकर आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून प्रारूप आराखड्यावर 488 हरकती आणि सूचना दाखल करण्यात आल्या आहे. या हरकती, सूचनांवर उद्या 10, 11 आणि 12 सप्टेंबर 2025 रोजी यशवंतराव चव्हाण केंद्रात सकाळी 11 ते सायंकाळी 5.30 दरम्यान सुनावणी होणार आहे. यात हरकतदारांनी नेमून दिलेल्या दिवशी वेळेत उपस्थित राहण्याचे महानगरपालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे. निवडणुकीसाठी विविध टप्पे निश्चित केले आहेत. या अंतर्गत दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्धीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यावर शुक्रवार, दिनांक 22 ऑगस्ट 2025 ते गुरूवार, दिनांक 4 सप्टेंबर 2025 दुपारी तीन वाजेपर्यंत या मुदतीत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यावर आता सुनावणी होणार आहे.
मुंबईसह अ ब क वर्गातील सहा महापालिकांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक या महापालिकांचा समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची ही पहिली पायरी मानली जात आहे. मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस प्रभागांची संख्या कायम ठेवण्यात आली असून, 2017 च्या निवडणुकीतील रचनेत फारसे बदल नाहीत. मात्र, सागरी किनारा मार्ग, अटल सेतू आणि मेट्रोच्या बांधकामांचा प्रभाग रचनेत समावेश करण्यात आला आहे. नवी मुंबईत 111 नगरसेवकांसाठी 28 प्रभाग, कल्याण-डोंबिवलीत122 जागांसाठी 31 प्रभाग असतील. पुण्यात 41 प्रभाग असून, त्यापैकी 40 प्रभाग चार सदस्यीय तर एक प्रभाग पाच सदस्यीय असेल. पिंपरी-चिंचवडमध्ये 32 प्रभाग आणि नाशिकमध्ये 31 प्रभाग जाहीर झाले आहेत, ज्यात 29 प्रभाग चार सदस्यीय तर दोन प्रभाग तीन सदस्यीय आहेत. नागरिकांना या प्रारूप रचनेवर हरकती आणि सूचना मांडण्याची संधी मिळेल. यंदा प्रभागांमध्ये मोठे फेरबदल झालेले नाहीत.
आणखी वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
























