एक्स्प्लोर

Gold Silver Rate : चांदी 5000 रुपयांनी स्वस्त, सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर

Gold-Silver Rates : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. चांदीच्या दरात आज ट्रेडिंग सुरु होताच 5000 रुपयांची घसरण झाली.  

नवी दिल्ली :  सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. दुसरीकडे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये देखील सुरुवातीला थंड प्रतिसाद दिसून आला. सोने आणि चांदीच्या दरात सुरु असलेल्या तेजीला आज ब्रेक लागला. एमसीएक्सवर आज ट्रेडिंग सुरु होताच चांदीचे दर 5000 रुपयांनी घसरले. त्याचवेळी सोन्याचे दर देखील कोसळल्याचं पाहायला मिळालं.

चांदीचे दर घसरले

कमोडिटी मार्केटमध्ये गुरुवारी चांदीच्या रात घसरण पाहायला मिळाली. एमसीएक्सवर चांदीचा दर बुधवारी  278364 रुपये होता. त्यात आज  5804 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. चांदीचा दर आज 272560 रुपयांवर आला. चांदीच्या दरानं  29 जानेवारीला 4 लाख  20 हजार 48 रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत चांदीचे दर 1 लाख 47 हजार 488 रुपयांनी कमी झाले आहेत.  

सोन्याच्या दरात घसरण

चांदीच्या दरात घसरण झाली आहे, त्याप्रमाणं सोन्याच्या दरात देखील घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 2 एप्रिलच्या वायद्याचे सोन्याचे दर 160516 वर पोहोचले होते. बुधवारी एमसीएक्सवर सोन्याचादर 161145 प्रति तोळा इतके होते. म्हणजे आज सोने 629  रुपये कमी होते. सोन्याच्या दरानं देखील 29 जानेवारीला 1 लाख 93 हजार 96 रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत  सोनं सध्या 32580 रुपयांनी घसरले आहेत.  

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशननं जारी केलेल्या दरांनुसार 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 159040 रुपये आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 155230 रुपये आहे. 20 कॅरेट सोनं 141550 रुपये एक तोळा आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दराचा विचार केला असता एका तोळ्यासाठी 128830 रुपये मोजावे लागतील. तर, 14 कॅरेट सोन्याचा दर 102580 रुपये मोजावे लागतील. आयबीजेएकडून दिवसातून दोन वेळा सोन्याचे दर जाहीर केले जातात. हे दर जीएसटी आणि मेकिंग चार्जेस शिवायचे असतात.

शेअर बाजारात काय घडलं? 

एकीकडे सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्याच प्रमाणं शेअर बाजारात देखील आज तेजी आणि घसरणीचा ट्रेंड पाहायला मिळाली. सुरुवातीला सेन्सेक्स आणि निफ्टीत तेजी दिसून आली.मात्र, त्यानंतर लगेचच घसरण झाली. सेन्सेक्स आज 27.46 अंकांच्या घसरणीसह 82248.61 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी 14.05 अंकांच्या  तेजीसह 25496.55 अंकांवर बंद झाला. 

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! होर्मुझमधून होणारा 90 टक्के एलपीजी पुरवठा धोक्यात, कंपन्याना 700 कोटी रुपयांचा फटका, दरात वाढ होणार का? 
सावधान! होर्मुझमधून होणारा 90 टक्के एलपीजी पुरवठा धोक्यात, कंपन्याना 700 कोटी रुपयांचा फटका, दरात वाढ होणार का? 
Share Market : निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये घसरण, तीन दिवसांच्या तेजीला ब्रेक, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये घसरण, तीन दिवसांच्या तेजीला ब्रेक, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
30 भारतीयांचा मृत्यू, महागाईत 2.5 टक्क्यांची वाढ, अमेरिका-इराण युद्धात भारताचे नेमके किती झाले नुकसान?
30 भारतीयांचा मृत्यू, महागाईत 2.5 टक्क्यांची वाढ, अमेरिका-इराण युद्धात भारताचे नेमके किती झाले नुकसान?
Inflation : देशामध्ये महागाईचा भडका, आरबीआयची नियंत्रण रेषा ओलांडली, कर्जाचा EMI वाढणार? आरबीआयच्या बैठकीकडे लक्ष
देशामध्ये महागाईचा भडका, आरबीआयची नियंत्रण रेषा ओलांडली, कर्जाचा EMI वाढणार?

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget