MPSC Exam | राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC च्या राज्यसेवा परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. 2 जानेवारी, 2022 रोजी 290 पदांसाठी परीक्षा होणार आहे. मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येणार आहे
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत येणारे एकूण 290 पदांच्या भरती करिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 घेण्यात येणार आहे. 5 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी दोन वाजल्यापासून ते 25 ऑक्टोबर 2021 रात्री 11:59 पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज सादर करायचे आहेत
हे सर्व अर्ज परीक्षा शुल्कासह ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल. https://t.co/XnX063nev0
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) October 4, 2021
उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षा योजना, अभ्यासक्रम, इत्यादीबाबतच्या सविस्तर तपशीलासाठी आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या माहितीचे व सविस्तर जाहिरातीचे कृपया अवलोकन करावे.
संबंधित बातम्या :
MPSC Results Announced : राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI