MPSC Results Announced : राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम
MPSC Final Result 2019 : यूपीएससी पाठोपाठ राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 (एमपीएससी) चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम अव्वल आला आहे
![MPSC Results Announced : राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम MPSC result announced Maharashtra Public Service Commission Results announced MPSC Results Announced : राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/28/a93b8132ee34c84260ad7fd177dcd3f4_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
MPSC Final Result 2019 : यूपीएससी पाठोपाठ राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 (एमपीएससी) चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम अव्वल आला आहे. तर मानसी पाटील मुलींमध्ये प्रथम आली आहे. मागील अनेक दिवसांपासून हे उमेदवार एमपीएससीकडे निकाल लावण्याची मागणी करत होते अखेर आज निकाल जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2019- लिपिक टंकलेखक परीक्षेचा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/MqtiKQRKMZ
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) September 28, 2021
राज्य सेवा आयोगाने एकूण 420 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या माध्यमातून उप जिल्हाधिकारी , तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस उपअधिक्षक अशी वेगवेगळी 26 प्रकारची पदे भरली जाणार आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 चा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)