MBBS च्या दुसऱ्या अन् तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा 10 जूनलाच; महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची भूमिका
MBBS च्या परीक्षा ऑनलाइन घेण्याबाबतची याचिका सुद्धा फेटाळली गेली. त्यामुळे परीक्षा या 10 जून पासून ऑफलाइन पद्धतीने वेळापत्रकानुसार होणार असल्याचे परिपत्रक काल विद्यापीठाकडून काढण्यात आले आहे. यामध्ये परीक्षा नियोजनाबाबत काही सूचना वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठाता/ प्राचार्य यांना दिल्या आहेत.
मुंबई : राज्यातील एमबीबीएस दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या हिवाळी परीक्षा पुढे ढकलत ढकलत अखेर 10 जूनपासून घेण्यावर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ ठाम आहे. या परीक्षा कोरोनाची स्थिती पाहता पुढे ढकलल्या जाव्यात किंवा ऑनलाइन घेतल्या जाव्यात अशी मागणी विद्यार्थी आणि विविध संघटनाकडून केली जात होती. शिवाय, या परीक्षेला विरोध केला जात होता. मात्र, उच्च न्यायालयाच्या आणि केंद्रीय कौन्सिलच्या निर्देशनुसार या परीक्षा ऑनलाइन घेण्यास परावनगी नाही.
या परीक्षा ऑनलाइन घेण्याबाबतची याचिका सुद्धा फेटाळली गेली. त्यामुळे परीक्षा या 10 जून पासून ऑफलाइन पद्धतीने वेळापत्रकानुसार होणार असल्याचे परिपत्रक काल विद्यापीठाकडून काढण्यात आले आहे. यामध्ये परीक्षा नियोजनाबाबत काही सूचना वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठाता/ प्राचार्य यांना दिल्या आहेत.
यामध्ये विद्यार्थ्यांला परीक्षा देण्यासाठी कोविड RTPCR टेस्ट रिपोर्ट नेगटीव्ह असणे बंधनकारक असणार आहे. यासाठी 10 जूनपूर्वी विद्यार्थ्यांनी ही टेस्ट करून आपला रिपोर्ट परीक्षा केंद्रावर परिक्षेच्या दिवशी जमा करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना RTPCR रिपोर्ट नसेल त्यांनी परिक्षेच्या दिवशी अँटिजण टेस्ट करून त्याचा रिपोर्ट नेगटीव्ह आल्यावर परीक्षा देता येईल. तरीसुद्धा अशा विद्यार्थ्यांनी 15 जूनपर्यंत हा RTPCR रिपोर्ट जमा करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांचा कोरोना RTPCR चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे, त्या विद्यार्थ्यांला परीक्षा केंद्रावर परीक्षा देता येणार नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी या परिक्षेनंतर वेगळी परीक्षा घेतली जाईल .
शिवाय, ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वसतिगृहात रहावे लागणार आहे. त्यासाठी वसतिगृहात सर्व प्रकारची तयारी महाविद्यालयांनी करायची आहे. जेणेकरून सोशल डिस्टनसिंग पाळलं जाईल आणि वसतिगृह सॅनिटाइज केलेले असेल, याची जबाबदारी महाविद्यालयाची असणार आहे. त्यामुळे प्रचंड विरोधानंतर विद्यार्थ्यांना या परीक्षा या 10 जूनपासून द्याव्या लागणार आहेत. विद्यार्थ्यांच्या संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी ही प्रशासनाची असून त्या प्रकारे तयारी सुद्धा परिक्षेपूवी महाविद्यालय प्रशासनाला करावयाची आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI