एक्स्प्लोर

तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक बाधा होणार हा केवळ अंदाज आहे, त्याची भीती अनाठायी : डॉ. प्रदीप आवटे

तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक बाधा होणार हा केवळ अंदाज आहे, त्याची भीती अनाठायी असल्याचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले आहे.महाराष्ट्रात कोरोनाच्या बालरुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणीय वाढ नाही, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबई : कोविडच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक बाधा होणार, अशा भाकिताची भीती, पॅनिक समाजामध्ये पसरलेली दिसत आहे. मात्र, तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना अधिक बाधा होईल या भाकिताला कोणताही ठोस शास्त्रीय आधार आहे, असे म्हणता येणार नाही, अशी माहिती राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली आहे. उलट महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा बदल आढळून आला नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.  

कोरोनाला बळी पडलेल्या 18 वर्षांखालील मुलांचे प्रमाण मे 2021 मध्ये सुमारे 0.07 टक्के इतके आहे. यावरून लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. राष्ट्रीय पातळीवरील सल्लागारांनी तिसऱ्या लाटेत बालकांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे राज्य शासनाने राज्यस्तरीय बालरोगतज्ञांचा टास्क फोर्स स्थापन केला आहे. त्याचबरोबर राज्य सरकार बालकांवरील उपचारांच्या दृष्टीने रुग्णालयस्तरावर पायाभूत सुविधा, यंत्रणा उभारण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करीत असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

डॉ. प्रदीप आवटे काय म्हणाले?

  • 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण होते आहे, त्यामुळे विषाणू स्वतःमध्ये बदल करून लहान मुलांमध्ये शिरकाव करेल, असा एक तर्क आहे. या तर्काला कोणताही आधार नाही. 
  • बालरोग तज्ञांच्या संघटनेने देखील हे सुस्पष्ट केले आहे. इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रीक्सने याबाबत सविस्तर निवेदन दिले आहे. त्यात ते म्हणतात - 
  • तिसऱ्या लाटेची शक्यता आहे पण ती कधी येईल आणि किती तीव्र असेल या बाबत अनुमान करणे कठीण आहे.
  • मोठ्या माणसाप्रमाणेच लहान मुलांनाही कोविड होण्याची भीती असते पण तिसऱ्या लाटेमध्ये मुले सर्वाधिक बाधित होण्याची शक्यता अगदीच कमी आहे. 
  • 90 टक्के मुलांमधील कोविड सौम्य स्वरूपाचा असतो. गंभीर कोरोनाचे प्रमाण मुलांमध्ये अत्यल्प आहे.
  • काही मुलांना आयसीयूची गरज लागू शकते पण त्यांचे प्रमाण फार मोठे नाही आणि ती तयारी आपण करत आहोत.
  • लहान मुलांमध्ये या विषाणूच्या शरीरात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असणारे विशिष्ट  रिसेप्टर विकसित झालेले नसतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये फार गंभीर आजार उद्भवताना दिसत नाहीत. 
  • सध्या माध्यमे राज्यातील किंवा एखाद्या जिल्ह्यातील बाधित मुलांची संख्या सांगून बातम्यांची हेडलाईन्स बनवताना दिसत आहेत.  
  • मुळामध्ये मागील सहा महिन्यांमध्ये पाच वर्षाखालील मुलांचे कोविडमुळे बाधित होण्याचे प्रमाण प्रत्येक महिन्यामध्ये साधारणपणे एकूण रुग्णांच्या एक ते दीड टक्‍क्‍यांच्या दरम्यान राहिले आहे. 
  • हे आजही बदलताना दिसत नाही तथापि जेव्हा एकूण रुग्ण संख्या दोन लाखावरुन दहा लाखांवर जाते तेव्हा स्वाभाविकच दोन लाखापेक्षा दहा लाखातील दीड टक्का हे  निव्वळ संख्येमध्ये अधिक असतात, हे आपण लक्षात घेत नाही. 
  • सगळ्यात महत्वाचे म्हणजे लहान मुले जरी कोविड बाधित झाली तरी त्यांच्यामध्ये प्रौढ व्यक्तींच्या तुलनेत गुंतागुंतीचे आणि मृत्यूचे प्रमाण खूप कमी आहे. 
  • आपण अगदी मे महिन्याचे उदाहरण घेतले तरी अठरा वर्षाखालील मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण 0.07 एवढे आहे.  
  • साधारणपणे दहा हजार मुलांना हा आजार झाला तर त्यातील एकाचा मृत्यू होतो, असे हे सर्वसाधारण प्रमाण आहे. ज्या मुलांना इतर अतिजोखमीचे आजार आहेत त्यांच्यामध्ये अशी गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असते.
  • लहान मुलांमध्ये कोविडचे प्रमाण वाढू शकते हे भाकीत मनावर घेऊन आपण त्या अनुषंगाने तयारी करतो आहोत ही चांगली गोष्ट आहे.
  • कोणतीही तयारी वाया जात नाही. परंतु, त्यामुळे लहान मुले असणाऱ्या पालकांमध्ये आणि एकूणच समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणे फारसे हितावह नाही.
  • आपण काळजी घ्यावयाची आहेच. आपल्या मुलांचे नियमित लसीकरण पूर्ण झाले आहे ना, याची खात्री करून घ्या. राहिलेल्या लसी नक्की आणि वेळेत पूर्ण करा. 
  • तिसऱ्या लाटेच्या भीतीने उगीच मुलावर नको ती बंधने घालू नका आणि स्वतः ही घाबरून जाऊ नका, असे आवाहन डॉ. प्रदीप आवटे यांनी केलं आहे.

एकूण कोरोनाबाधीतांमध्ये कोरोना संसर्गित मुलांचे प्रमाण खालील प्रमाणे आहे:

नोव्हेंबर 2020 ते एप्रिल 2021 या दरम्यान वयोगटानुसार बाधीतांचे प्रमाणे असे आहे - शून्य ते पाच 1.3 टक्के, सहा ते अकरा वर्षे 2.4 टक्के, बारा ते सतरा 4.1 टक्के, एकूण 7.8 टक्के.
नोव्हेंबर 2020 (वयोगट शून्य ते पाच वर्षे 1.3 टक्के, सहा ते अकरा वर्षे 2.1 टक्के, बारा ते सतरा वर्षे 3.5 टक्के, एकूण 6.9 टक्के)
डिसेंबर 2020 (वयोगट शून्य ते पाच वर्षे 1.1 टक्के, सहा ते अकरा वर्षे 1.9 टक्के, बारा ते सतरा वर्षे 3.3 टक्के, एकूण 6.3 टक्के)
जानेवारी 2021 (वयोगट शून्य ते पाच वर्षे 1.1 टक्के, सहा ते अकरा वर्षे 1.7 टक्के, बारा ते सतरा वर्षे 3.2 टक्के, एकूण 6.0 टक्के)
फेब्रुवारी 2021 (शून्य ते पाच वर्षे 1.18 टक्के, सहा ते अकरा वर्षे 2.00 टक्के, बारा ते सतरा वर्षे 4.08 टक्के, एकूण 7.26 टक्के)
मार्च 2021 (शून्य ते पाच वर्षे 1.10 टक्के, सहा ते अकरा वर्षे 2.04 टक्के, बारा ते सतरा वर्षे 3.64 टक्के, एकूण 6.78 टक्के) 
एप्रिल 2021 (वयोगट शून्य ते पाच वर्षे 1.42 टक्के, सहा ते अकरा वर्षे 2.62 टक्के, बारा ते सतरा वर्षे 4.34 टक्के, एकूण 8.38 टक्के) या आकडेवारीवरून हे स्पष्ट दिसून येते की कोरोना संसर्गित बालकांचे प्रमाण गेल्या सहा महिन्यात जवळपास तेवढेच राहिले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील संसर्गाची स्थिती काहीशी अशीच आहे. मार्च 2021 मध्ये (शून्य ते पाच वर्षे वयोगटात 188 रुग्ण होते, ते एकूण रुग्णांच्या 1.01 टक्के होते, सहा ते दहा वर्षे वयोगटातील 270 रुग्ण, एकूण प्रमाण 1.45 टक्के, अकरा ते अठरा वर्षे वयोगटात 1173 रुग्ण, एकूणात प्रमाण 6.28 टक्के, शून्य ते अठरा वर्षे वयोगटात 1631 रुग्ण एकूणात प्रमाण 8.74 टक्के, कोरोनाचे एकूण रुग्ण 18 हजार 669)

एप्रिल 2021 मध्ये (शून्य ते पाच वर्षे वयोगटात ७५७ रुग्ण, एकूण रुग्णांच्या 0.98 टक्के, सहा ते दहा वर्षे वयोगटात 1510 रुग्ण, एकूणात प्रमाण 1.95 टक्के, अकरा ते अठरा वर्षे वयोगटात 5340 रुग्ण, एकूणात प्रमाण 6.90 टक्के, शून्य ते अठरा वर्षे वयोगटात 7607 रुग्ण एकूणात प्रमाण 9.83 टक्के, कोरोनाचे एकूण रुग्ण 77 हजार 344)

मे 2021 मध्ये (शून्य ते पाच वर्षे वयोगटात 1076 रुग्ण एकूण रुग्णांच्या 1.33 टक्के, सहा ते दहा वर्षे वयोगटात 1918 रुग्ण, एकूणात प्रमाण 2.37 टक्के, अकरा ते अठरा वर्षे वयोगटात 6422 रुग्ण, एकूणात प्रमाण 7.95 टक्के, शून्य ते अठरा वर्षे वयोगटात 9416 रुग्ण एकूणात प्रमाण 11.65 टक्के, कोरोनाचे एकूण रुग्ण 80 हजार 785) यावरून हे दिसून येते की 18 वर्षांखालील मुलांमधे संसर्गाचे प्रमाण साधारणपणे सारखेच आहे. कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्या वाढीमुळे बालकांच्या संसर्गातील वाढ दिसून आली आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार

व्हिडीओ

Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
Embed widget