गरीब विद्यार्थ्यांना मोबाईल रिचार्जसाठी हजार रुपयांची मदत, नवी मुंबई महापालिकेचा निर्णय
Navi Mumbai Municipal on Students : विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी नवी मुंबई महानगर पालिकेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटरनेट डेटा प्लान रिचार्ज करण्यासाठी एक हजार रूपयांची मदत करणार आहे.
![गरीब विद्यार्थ्यांना मोबाईल रिचार्जसाठी हजार रुपयांची मदत, नवी मुंबई महापालिकेचा निर्णय Navi Mumbai Municipal Corporation announces a financial assistance of Rs 1000 for all its students for digital learning गरीब विद्यार्थ्यांना मोबाईल रिचार्जसाठी हजार रुपयांची मदत, नवी मुंबई महापालिकेचा निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/02/927339a2446ae4197807b05ff0d91e49_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी मुंबई : विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी नवी मुंबई महानगर पालिकेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटरनेट डेटा प्लान रिचार्ज करण्यासाठी एक हजार रूपयांची मदत करणार आहे. 1 हजार रूपयांत 6 महिन्यांपर्यंत अनलिमिटेड डेटा मिळत असल्याने पहिल्या सहा महिन्यांसाठी 1 हजार रूपये विर्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत.
गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या कोरोना साथ रोगामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्याला शासकीय व खासगी शाळांना ऑनलाईन वर्गाचा पर्याय निवडला आहे. पण मागील वर्षी नवी मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण हवे तसे होऊ शकले नाही, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांकडे मोबाईल नव्हते. तसेच काही विद्यार्थ्यांच्या पालकांकडे मोबाईल आहेत तर रिचार्जसाठी पैसे नव्हते. यंदाही तिसऱ्या लाटेच्या भीतीने थेट शाळा सुरू होणार नसल्याने यंदाही ॲानलाईन शिक्षणाशिवाय पर्याय नाही.
हे लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी नवी मुंबई महानगर पालिकेने विद्यार्थ्यांना इंटरनेट डेटा प्लान रिचार्ज करण्यासाठी एक हजार रूपयांची मदत करणार आहे. 1 हजार रूपयांत 6 महिन्यांपर्यंत अनलिमिटेड डेटा मिळत असल्याने पहिल्या सहा महिन्यांसाठी 1 हजार रूपये विर्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. ॲानलाईन शिक्षणाबरोबर कृती पुस्तिका देवून ती लिहून घेतली जाईल. यावर महानगर पालिका शिक्षण विभाग देखरेख ठेवणार असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. सध्या महानगर पालिकेच्या 72 शाळा असून या मध्ये 42 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितलं की, महापालिकेने निर्णय घेतला आहे की प्रत्येक मुलाच्या अकाऊंटवर एक हजार रुपये डीबीटी तत्वावर उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. 1 हजार रूपयांत 6 महिन्यांपर्यंत अनलिमिटेड डेटा मिळत असल्याने पहिल्या सहा महिन्यांसाठी 1 हजार रूपये विर्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. ज्या मुलांच्या पालकांकडे मोबाईल नाहीत अशा मुलांसाठी देखील काही पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न महापालिकेकडून सुरु आहेत, असं देखील बांगर यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)