JNU Post Graduation Admission 2023 : आज जेएनयू PG प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी होणार जाहीर; 'अशा' प्रकारे करा डाऊनलोड
JNU Post Graduation Admission 2023 : विद्यार्थ्यांची आज गुणवत्ता यादी जारी केल्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठाकडून नावनोंदणीपूर्व नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाईल.
JNU Post Graduation Admission 2023 : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आज (17 ऑगस्ट रोजी) JNU PG ची पहिली गुणवत्ता यादी 2023 जाहीर करण्यासाठी सज्ज आहे. प्रवेशासाठी अर्ज केलेले विद्यार्थी jnuee.jnu.ac.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्या नावाची यादी तपासू शकतात. कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET) PG 2023 गुणांच्या आधारे हा प्रवेश घेतला जात आहे.
21 ऑगस्टपर्यंत पैसे भरता येतील
विद्यार्थ्यांची आज गुणवत्ता यादी जारी केल्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठाकडून (JNU) नावनोंदणीपूर्व नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाईल. प्रवेश शुल्क भरण्याची तारीख आजपासून म्हणजेच 17 ऑगस्टपासून सुरु केली जाईल. फी भरण्याची आणि पहिल्या यादीच्या आधारे जागा आरक्षित करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्टपर्यंत असेल. 21 ऑगस्टनंतर कोणताही विद्यार्थी शुल्क भरू शकणार नाही.
तसेच, JNU PG 2023 पहिली गुणवत्ता यादी ऑनलाईन (Online) डाऊनलोड करण्यासाठी आणि तपासण्यासाठी विद्यार्थी खाली दिलेल्या माहितीनुसार फॉलो करू शकतात.
JNU PG 1ली मेरिट लिस्ट 2023 कशी तपासायची?
सर्वात आधी विद्यार्थ्यांना jnuee.jnu.ac.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर आता तुमच्या होमपेजवर तुम्हाला ओपन झालेली ही लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.
या लिंकवर क्लिक केल्यानंतर, तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला 'JNU PG मेरिट लिस्ट 2023' यावर क्लिक करायचं आहे.
आता तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक आणि तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे. लिस्ट तुमच्या समोर ओपन होईल.
आता तुम्ही ही गुणवत्ता यादी डाऊनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट आउट देखील घेऊ शकता.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ 1 सप्टेंबरपासून परदेशी भाषांमधील एमए अभ्यासक्रमांसाठी उमेदवारांच्या कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी आणि नोंदणी करणार आहे. तसेच, इतर अभ्यासक्रमांसाठी पडताळणी 4, 5, 6, 8, 11, 12 आणि 13 सप्टेंबर 2023 रोजी केली जाईल.
दुसरी गुणवत्ता यादी 25 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाईल
पहिल्या यादीत वाटप केलेल्या जागा ब्लॉक करण्यासाठी 17 ते 21 ऑगस्ट या कालावधीत पूर्व नोंदणी आणि नोंदणीचे पैसे भरता येतील. अतिरिक्त जागांसाठी दुसरी गुणवत्ता यादी आणि गुणवत्ता यादी 25 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे. वाटप केलेल्या जागा असलेल्या विद्यार्थ्यांना 28 ऑगस्टपर्यंत दुसऱ्या गुणवत्ता यादीतील जागा आणि अतिरिक्त कोट्यातील जागा ब्लॉक करण्यासाठी शुल्क भरावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI