Mumbai: स्पर्धा परीक्षांमध्ये पुन्हा एकदा कॉपीचा प्रकार उघडकीस? सहकार विभागाच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान उमेदवाराकडे मोबाईल
Competitive Exams Copy Case: बोरिवलीच्या परीक्षा केंद्रावरुन सहकार विभागाची परीक्षा देणाऱ्या उमेदवाराकडे ऑनलाईन परीक्षेदरम्यान मोबाईल आढळला आहे.
Mumbai: सहकार विभागाची परीक्षा सुरू असताना हाय टेक कॉपी (Copy) प्रकरणात एका उमेदवाराला कस्तुरबा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बोरिवलीच्या (Borivali) एल एन कॉलेज परीक्षा केंद्रावर राज्याच्या सहकार विभागातील गट क संवर्गातील सरळसेवेतील रिक्त पदांसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देत होते. या परीक्षेदरम्यान परीक्षा देणाऱ्या काही उमेदवारांनी याच केंद्रावरील परीक्षा देत असलेल्या एका उमेदवाराकडे मोबाईल असल्याचं निदर्शनास आणून दिलं आहे.
परीक्षा केंद्रावरील इतर उमेदवांरांनी केली तक्रार
सहकार विभागाची परीक्षा देणाऱ्या उमेदवाराकडे ऑनलाईन परीक्षेदरम्यान मोबाईल आढळला, त्याच्याच परीक्षा केंद्रावरील इतर परिक्षार्थींनी सदर घटनेची तक्रार नोंदवली. ज्या उमेदवाराकडे मोबाईल आढळला, तो मोबाईलमधून कॉपी करत होता, अशी तक्रार इतर उमेदवारांनी पोलिसांकडे केली आहे. यानंतर परीक्षेदरम्यान मोबाईल बाळगणाऱ्या उमेदवाराला कस्तुरबा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
सदर उमेदवाराने आरोप फेटाळले
स्पर्धा परीक्षांमध्ये परीक्षा केंद्रावर मोबाईल वापरण्यास सक्त मनाई असताना या उमेदवाराकडे मोबाईल मिळाल्याने कस्तुरबा पोलिसांनी या उमेदवाराला ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी केली जात आहे. मात्र ज्या उमेदवाराकडे हा मोबाईल मिळाला आहे, त्याने आपल्यावर होणारे आरोप चुकीचे असून मेडिकल एमर्जन्सीमुळे मोबाईल वापरला असल्याचं पोलिसांना वारंवार सांगितलं आहे.
मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेतही कॉपीचा प्रकार
मुंबई पोलीस भरतीची लेखी परीक्षा 7 मे रोजी मुंबईतील विविध केंद्रांवर पार पडली. मात्र याच पोलीस भरती प्रक्रियेमध्ये मोठा गैरप्रकार घडल्याचं समोर येत आहे. या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत हायटेक कॉपी (Hi-Tech Copy) करुन शेकडो विद्यार्थी परीक्षेला बसले असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समिती संघटनेने केला आहे. उमेदवारांनी कॉपी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा गैरवापर केल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं होतं.
परीक्षेच्या दिवशी कॉपी करणाऱ्या काही उमेदवारांविरोधात मुंबई पोलिसांनी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे, गोरेगाव पोलीस ठाणे, मेघवाडी पोलीस ठाणे आणि भांडुप पोलीस ठाण्यात चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. ब्लुटूथ हेडफोनच्या मदतीने ही कॉपी केल्याचं म्हटलं जात आहे. मात्र या कॉपी प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचं आता समोर येत आहे. औरंगाबाद येथील एका 19 वर्षीय तरुणीला मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.
सविस्तर वाचा:
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI