JEE Main Result : जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर, jeemain.nta.nic.in वर पाहा निकाल
JEE Main Exam Result 2022 : जेईई मेन परीक्षेच्या पहिल्या सत्राचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. जेईई मेन सत्र 2 ची परीक्षा (JEE Main Session 2 Exam 2022) जुलै महिन्याच्या शेवटी होणार आहे.
JEE Result 2022 : नॅशनल टेस्टिंग एजंसी (NTA) ने आज जेईई मेन परीक्षेचा निकाल (JEE Main Result 2022) जाहीर केला आहे. विद्यार्थी jeemain.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहू शकतात. यासाठी विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर जाऊन क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करुन निकाल पाहता येईल.
या वर्षी जेईई मेन परीक्षेच्या (JEE Main Result 2022) तारखांमध्ये काही बदल करण्यात आला होता. साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये जेईई मेन परीक्षा घेण्यात येते. पण यंदाच्या वर्षी परीक्षेची तारीख आधी मे महिना आणि त्यानंतर जून महिन्यात पुढे ढकलण्यात आली होती. जेईई मेन पहिल्या सत्राची परीक्षा 20 जून 2022 ते 29 जून 2022 या कालावधीत घेण्यात आली.
जेईई मेनचा निकाल कसा तपासाल? (Check JEE Main Result 2022)
- स्टेप 1 : विद्यार्थ्यांना jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येईल.
- स्टेप 2 : वेबसाईटवरील होमपेजवर JEE Main Result 2022 या निकालासाठीच्या लिंकवर क्लिक करा.
- स्टेप 3 : यानंतर विद्यार्थ्याने आयडी आणि पासवर्ढ प्रविष्ट करावा.
- स्टेप 4 : यानंतर तुम्हाला तुमचा निकाल ऑनलाईन पाहता येईल.
- स्टेप 5 : विद्याथी निकाल डाउनलोड करु शकतात.
- स्टेप 6 : गरजेनुसार विद्यार्थी निकालाची प्रिंटही काढू शकतात.
जेईई मेन सत्र 2 ची परीक्षा कधी?
जेईई मेन सत्र 2 ची परीक्षा 21 जुलै ते 30 जुलै दरम्यान घेण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- CUET PG 2022 : सीयूईटी पीजीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी, लवकर करा अर्ज
- Job Majha : भारतीय नौदलासह कोल इंडिया लिमिटेडमध्ये मेगा भरती, आजच करा अर्ज
- GRSE Recruitment 2022 : GRSE मध्ये 50 पेक्षा जास्त पदांसाठी भरती, 'या' दिवसापूर्वी करा अर्ज
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI