(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ITBP Recruitment 2023 : ITBP मध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, 458 जागांची भरती; 'असा' करा अर्ज
ITBP Recruitment 2023 : इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) च्या वतीने बंपर पदावर भरती करण्यात आली.
ITBP Recruitment 2023 : तुम्हाला जर बॅंकेत नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. संरक्षण क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) च्या वतीने बंपर पदावर भरती करण्यात आली. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख अगदी जवळ आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल आणि अधिसूचना पाहावी लागेल. 27 जूनपासून भरती प्रक्रिया सुरू झाली असून ती 26 जुलैपर्यंत चालणार आहे.
या भरती मोहिमेद्वारे इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्समध्ये 458 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये एकूण 458 कॉन्स्टेबल गट 'क' अराजपत्रित (नॉन-मिनिस्ट्रियल) पदांचा समावेश आहे.
ITBP भर्ती 2023 आवश्यक शैक्षणिक पात्रता
या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मॅट्रिक आणि 10वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून समकक्ष पात्रता असणं गरजेचं आहे. याशिवाय, उमेदवाराकडे वैध अवजड वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) असावा.
ITBP भर्ती 2023 वयोमर्यादा किती असावी?
अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 27 वर्ष दरम्यान असावे.
ITBP भर्ती 2023 पगार किती मिळणार?
या पदांवरील निवडलेल्या उमेदवारांना 21,700 ते 69,100 रुपये वेतन देण्यात येईल.
ITBP भर्ती 2023 या महत्त्वाच्या तारखा आहेत
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 27 जून 2023
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2023
ITBP भर्ती 2023 अर्ज कसा करावा?
- उमेदवार recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत साईटला भेट दयावी.
- त्यानंतर होम पेजवर उपलब्ध असलेल्या नवीन यूजर नोंदणी लिंकवर क्लिक करा.
- यानंतर एक नवीन पेज ओपन होईल जिथे उमेदवारांना तपशील भरावा लागेल.
- आता पूर्ण झाल्यावर रजिस्टर वर क्लिक करा.
- त्यानंतर क्रेडेन्शियल्ससह खात्यात लॉगिन करा.
- आता अर्ज भरा आणि अर्ज फी भरा.
- त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा आणि हे पेज डाऊनलोड करा. तुम्ही या पेजची प्रिंट आऊटसुद्धा काढू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI