CAT 2022 Registration: CAT 2022 साठी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू, 'अशी' आहे प्रक्रिया
CAT 2022 Registration: IIM CAT 2022 ची प्रवेश परीक्षा 27 नोव्हेंबर रोजी तीन सत्रात घेतली जाईल.

CAT 2022 Registration : सामायिक प्रवेश परीक्षा (CAT) 2022 साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) आणि देशभरातील इतर सहभागी बी-स्कूलमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी अधिकृत साइट iimcat.ac.in वर जाऊन अर्ज भरू शकतात. या परीक्षेसाठी विद्यार्थी 14 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. IIM CAT 2022 ची प्रवेश परीक्षा 27 नोव्हेंबर रोजी तीन सत्रात घेतली जाईल. परीक्षेचे प्रवेशपत्र 27 ऑक्टोबरला जारी करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
किमान 50 टक्के गुणांसह पदवी पूर्ण केलेली असावी
परीक्षेत बसण्यासाठी विद्यार्थ्याने किमान 50 टक्के गुणांसह पदवी पूर्ण केलेली असावी. ही टक्केवारी SC, ST आणि अपंग विद्यार्थ्यांसाठी 45% वर ठेवली आहे. CAT चा निकाल जानेवारी 2023 च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल. CAT 2022 स्कोअर वेबसाइटवर उपलब्ध असेल आणि फक्त 31 डिसेंबर 2023 पर्यंत वैध असेल.
अर्ज फी
CAT 2022 साठी अर्ज करण्यासाठी, विद्यार्थ्यांना अर्ज शुल्क भरावे लागेल. SC, ST आणि PWD श्रेणीतील विद्यार्थ्यांना 1150 रुपये द्यावे लागतील. तर इतर सर्व श्रेणीतील विद्यार्थ्यांना 2300 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
असे करा रजिस्ट्रेशन
1: CAT 2022 साठी अर्ज करण्यासाठी, विद्यार्थी प्रथम अधिकृत साइट iimcat.ac.in ला भेट द्यावी.
2: त्यानंतर मुख्यपृष्ठावर CAT 2022 नोंदणीसाठी असलेल्या लिंकवर क्लिक करा.
3: यानंतर, विद्यार्थी अर्ज करण्यासाठी सर्व तपशील भरू शकतात.
4: आता विद्यार्थी त्यांचा अर्ज सबमिट करू शकतात.
5: यानंतर शेवटचे पान डाउनलोड करावे.
6: शेवटी अंतिम पानाची प्रिंट आऊट काढावी.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
