(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ICAI CA Final Result 2022: CA इंटर आणि फायनल्सचा निकाल जाहीर; कसा पाहाल?
ICAI CA Final Results 2022 Released: ICAI CA परीक्षेचा अंतिम निकाल 2022 जाहीर झाला आहे. अधिकृत वेबसाईटवर लॉगइन करुन तुम्ही निकाल पाहू शकता.
ICAI CA Final Results 2022 Released: इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडिया, आयसीएआय सीएचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. उमेदवार ICAI ची अधिकृत वेबसाईट icai.org च्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकतात. निकाल चेक करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
सीए इंटर आणि फायनलचे निकाल 10 जानेवारीला जाहीर होतील, असं काही दिवसांपूर्वीच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाकडून सांगण्यात आलं होतं. अखेर आज निकाल जाहीर झाला. निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना त्यांचा रोल नंबर आणि नोंदणी क्रमांक टाकून लॉग इन करावं लागेल.
सीए फायनलमध्ये हर्ष चौधरी आणि दिक्षा गोयल अव्वल
CA फायनल्स रिझल्ट नोव्हेंबर 2022 आणि CA इंटर रिझल्ट नोव्हेंबर 2022 च्या घोषणेसोबतच, ICAI नं या परीक्षांमधील त्यांच्या कामगिरीच्या आधारावर जास्तीत जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी देखील प्रसिद्ध केली आहे. संस्थेनं जारी केलेल्या यादीनुसार, हर्ष चौधरी CA फायनल नोव्हेंबर 2022 परीक्षेत 618 गुणांसह पहिला (AIR 1) आला असून दिक्षा गोयल CA इंटर नोव्हेंबर 2022 परीक्षेत 693 गुणांसह पहिली आली आहे.
सीए फायनल एग्जाम 2023 टॉपर्स लिस्ट
हर्ष चौधरी : रँक 1, गुण 618
शिखा जैन : रँक 2, गुण 617
राम्याश्री : रँक 2, गुण 617
मानसी अग्रवाल : रँक 3, गुण 613
सीए इंटर नोव्हेंबर 2022 टॉपर्स लिस्ट
दीक्षा गोयल : रँक 1, गुण 693
तूलिका जालान : रँक 2, गुण 677
सक्षम जैन : रँक 3, गुण 672
आयसीएआय सीएचा अंतिम निकाल जाहीर, कसा पाहाल निकाल?
सर्वात आधी ICAI च्या icai.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
त्यानंतर वेबसाईटच्या होम पेजवर उपलब्ध असलेल्या आयसीएआय सीए रिजल्ट 2022 या लिंकवर क्लिक करा
आता नवं पेज ओपन होईल, जिथे उमेदवारांना लॉगइन करावं लागेल
त्यानंतर निकाल तुम्हाला स्क्रिनवर दिसेल
निकाल पाहुन त्याची प्रिंट काढून ठेवा
सीए इंटर रिझल्ट लिंक
सीए फायनल रिझल्ट लिंक
महत्त्वाच्या इतर बातम्या :
SSC-HSC Exam: आता दहावी, बारावीच्या परीक्षेत होम सेंटर बंद; अशी असणार बैठक व्यवस्था
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI