एक्स्प्लोर

CBSE 10th Result 2020 | सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर, इथं पाहा निकाल

CBSE Class X Result 2020 दहावीचा निकाल आज जाहीर झाला. सीबीएसईचा बारावीचा निकाल 13 जुलै रोजी जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याविषयी उत्सुकता होती.

नवी दिल्ली : CBSE Class 10 Results  2020 Declared सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सीबीएसई बारावीचा निकाल दोन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आल्यानंतर आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सीबीएसईकडून सर्वोच्च न्यायालयात 15 जुलै किंवा त्यापूर्वी दहावी-बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल सीबीएसईच्या http://cbseresults.nic.in/ या वेबसाईटवर पाहता येणार आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे बारावीच्या निकालाप्रमाणेच कोणतीही पत्रकार परिषद किंवा गुणवत्ता यादी यावर्षी जाहीर करण्यात आलेली नाही. दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल म्हणजेच गुणपत्रिका, उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आणि मायग्रेशन सर्टिफिकेट डिजिलॉकर किंवा उमंग अॅपमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना एसएमएस करुनही आपला निकाल मिळवता येणार आहे. त्यासाठी CBSE10 असं टाईप करुन त्यानंतर एक स्पेस देऊन विद्यार्थ्यांचा रोल नंबर पुन्हा स्पेस हॉल तिकीट आयडी  टाईप करुन 7738299899 या क्रमांकावर पाठवला तर विद्यार्थ्यांना लगेच त्याचा दहावीचा निकाल कळू शकेल. सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेच्या काही विषयांचे पेपर कोरोना व्हायरसच्या साथीमुळे होऊ शकले नव्हते. त्यासाठी सीबीएसई बोर्डाने दोन वेळा परीक्षेचं वेळापत्र जाहीर करुन त्यात बदल करावे लागले. शेवटी सर्वोच्च न्यायालयात त्यांनी उर्वरीत विषयाच्या परीक्षा घेणार नसल्याचं जाहीर केलं. अनेक राज्य सरकारांनी परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे आज जाहीर झालेला निकाल हा बेस्ट ऑफ थ्री नुसार जाहीर करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी तीन पेक्षा जास्त विषयांच्या परीक्षा दिल्या आहेत, त्या विषयातील सरासरी गुण अन्य न झालेल्या विषयांनाही मिळणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी फक्त तीनच विषयांच्या परीक्षा दिल्या आहेत, त्यातील कोणत्याही दोन विषयातील सर्वाधिक गुणांची सरासरी न दिलेल्या पेपरला लागू असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी विशेषतः दिल्लीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक किंवा दोनच विषयाचा पेपर झाला आहे, त्यांचा निकाल त्या दोन विषयातील गुण तसंच वर्षभरातील परफॉर्मन्स यानुसार जाहीर केला जाईल. सीबीएसई 10वी रिझल्ट जाणून घेण्यासाठी स्टेप्स
  1. सीबीएसई बोर्डाच्या ऑफिशियल वेबसाईट  www.cbseresults.nic.in  वर लॉग इन करा.
  2. होम पेज वर "School Certificate Examination (Class X) Results 2020-" लिंक वर क्लिक करा.
  3. क्लिक केल्यानंतर जो नवीन रिझल्टचं पेज ओपन झालं आहे, त्यात आपला रोल नंबर, स्कूल नंबर, सेंटर नंबर आणि अॅडमिट कार्ड आयडी टाका. आणि सबमिट बटनावर क्लिक करा.
  4. सबमिट केल्यावर स्क्रिनवर निकाल दिसेल. त्याचे प्रिंटआऊट घ्या किंवा स्क्रिनशॉट घ्या.
कोरोनामुळे महाराष्ट्रासह दक्षिण भारतात अनेक विषयांचे पेपर झाले असले तरी उत्तर भारतात, मात्र सर्व पेपर झालेले नाहीत. सीबीएसई परीक्षांचा वाद सर्वोच्च न्यायालयाही पोहोचला होता. सीबीएसई बोर्डाने दोन वेळा परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या, मात्र अनेक राज्यांनी त्या तारखांना परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवल्याने सीबीएसईने 1 ते 15 जुलै दरम्यान जाहीर केलेल्या परीक्षा रद्द केल्या होत्या. तसंच सीबीएसईकडून न्यायालयात 15 जुलै किंवा त्यापूर्वी दहावी-बारावीचा निकाल जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Modi Cabinet Reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Modi Cabinet Reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं MPSC च्या अध्यक्षांसंदर्भात मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
देवेंद्र फडणवीस यांचं MPSC चे अध्यक्ष, सदस्यांविरोधातील कारवाईसाठी मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
Supreme Court Form 6 : 'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
Embed widget