CBSE Board | CBSE दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर
CBSE Board 2021 Date Sheet Released: सेन्ट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्यूकेशन (CBSE) बोर्ड दहावी आणि बारावी वर्गाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या असून त्या 4 मे ते 11 जून या दरम्यान होणार आहे.
![CBSE Board | CBSE दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर CBSE Board Exam Date Sheet 2021 CBSE Class 10 and 12 Time Table Schedule Released www.cbse.nic.in CBSE Board | CBSE दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/04/03073637/cbse.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली: CBSE बोर्डच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर झाली असून त्या दहावीची आणि बारावीची परीक्षा 4 मे ते 11 जून या दरम्यान घेण्यात येत आहेत. या परीक्षेचे वेळापत्रक बोर्डच्या cbse.gov.in या संकेत स्थळावर जाहीर करण्यात आले असून विद्यार्थी आणि पालकांना त्या ठिकाणी परीक्षेसंबंधी सर्व माहिती मिळेल.
cbse.gov.in या वेबसाइटवर भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावी अशा दोन पर्यायापैकी एका पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर स्क्रीनवर संपूर्ण माहिती दिसू शकेल. ती माहिती पीडीएफ फॉरमॅटमध्येही डाऊनलोड करणे शक्य आहे.
देशभरातील विविध राज्यातील दहावी आणि बारावीसाठी CBSE बोर्डच्या वतीनं परीक्षा घेण्यात येतात. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल यांनी सांगितलं होतं की 2 फेब्रुवारीला दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात येतील. त्यानुसार आज वेळापत्रकाची घोषणा करण्याता आली आहे. त्यानुसार दहावीच्या परीक्षा या 4 मे ते 10 जून दरम्यान तर बारावीची परीक्षा ही 4 मे ते 11 जून या दरम्यान होणार आहे.
ऑफलाईन होणार परीक्षा CBSE बोर्डच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीसाठीच्या या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. कोरोना काळात बरंच काम ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं होतं. पण कोणताही विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहू नये म्हणून ही या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. पण हे करताना कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे. त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर, मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.
प्रॅक्टिकल परीक्षा मार्चमध्ये CBSE च्या वतीनं आधीच जाहीर करण्यात आलं आहे की प्रॅक्टिकल परीक्षा या मार्चमध्ये घेण्यात येतील. त्या वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या दिवशी घेण्यात येतील असंही सांगण्यात आलं आहे. CBSE परीक्षांचा निकाल हा 15 जुलैपर्यंत लागण्याची शक्यता आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)