BYJU'S Introduce AI : विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी BYJU'S चा नवा उपक्रम, AI च्या सहाय्याने शिकवले जाणार
BYJU'S मध्ये आता AI च्या मदतीने शिकवले जाणार आहे.
BYJU'S generative AI for guiding students : BYJU'S कडून आता AI च्या सहाय्याने विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे. BYJU'S चा हा एक नवा उपक्रम असून हे AI माॅड्युल शिक्षकांची जागा घेणार नाही अशी माहितीदेखील BYJU'S ने दिली आहे. कंपनीने AI चे तीन नविन माॅड्युल नुकतेच सादर केले आहे. BADRI, Math GPT, and TeacherGPT हे ते माॅड्युल आहेत. विद्यार्थ्याच्या अभ्यासाचा पॅटर्न समजून घेण्यासाठी आणि शिकवण्याची नवीन पद्धती माहित होण्यासाठी या माॅड्युलचा वापर करण्यात येणार आहे. BYJU'S ची फाउंडर दिव्या गोकुलनाथ यांनी सांगितले कि, AI चा वापर हा शिक्षकांची जागा घेणार नाही मात्र चांगल्या प्रकारे कसे शिकवले जाऊ शकते हे सांगायला मदत करेल. या AI च्या मदतीने व्हिडीओद्वारे विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे. BYJU'S मध्ये काम करणाऱ्या शिक्षकांच्या कोणत्याही गोष्टीत AI बदल करू शकणार नाही. तसेच BYJU'S लाइव्ह क्लासमध्ये शिक्षक म्हणून आम्ही जे काम करतो त्यातही AI बदल करणार नाही. परंतु हे AI शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल योग्य तो माहिती देईल. ज्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी होऊ शकतो. असेही त्यांनी सांगितले
पुढे त्या म्हणाल्या , AI च्या नविन माॅड्युलमुळे कंपनीच्या उत्पन्नावर आणि मार्जिनवर देखील सकारात्मक परिणाम होऊ शकतो. AI चा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवणे हे संस्थेच्या प्रगतीसाठीही फायदेशीर आहे. हे टेक्नाॅलाॅजी विरूद्ध शिक्षक असे अजिबात नसणार आहे. तर ज्या टेक्नाॅलाॅजीने आपल्याला सक्षम बनवले त्याला सोबत घेऊन विद्यार्थ्यांना योग्य असणारे मार्गदर्शन करायचे आहे. याचा उपयोग करून शिक्षक अजून चांगले ज्ञान विद्यार्थ्यांना देऊ शकतात. AI च्या मदतीने अनेक अॅक्टिवीटीज करता येणार आहेत. BYJU'S चे लर्निंग आॅफिसर देव राॅय यांनी हे प्रोडक्टीव AI माॅड्युल तयार केले आहे. BADRI हे एखादा विद्यार्थी कशा पद्धतीने विषय समजून घेतो. अगदी त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना विषय समजून सांगू शकतो. सोबतच विद्यार्थी विषय समजून घेण्यात कमी पडत असेल तर ते शोधून AI इतर वेगळ्या पद्धतीने ते समजावून सांगू शकतो. BYJU'S WIZ विद्यार्थ्यांना 'काय शिकायचे' नाही तर 'कसे शिकायचे' हे सांगेल. एखाद्या टाॅपिक चा कन्सेप्ट पूर्ण समजणार नाही तोवर BYJU'S WIZ तुम्हाला ते शिकवत राहील.
इतर महत्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI