दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा आता दोन टप्प्यात! ज्या विषयांचा अभ्यास पूर्ण झाला, फक्त तेच पेपर देण्याचं स्वातंत्र्य
10th and 12th Exam : बोर्ड परीक्षा दोन टप्प्यात होणार आहेत. ज्या विषयांचा अभ्यास पूर्ण झाला, फक्त तेच पेपर देण्याचं स्वातंत्र्यही देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा आता दोन टप्प्यात होणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालय आज याबाबतचा निर्णय घेतला आहे. आगामी शैक्षणिक वर्षांपासून बोर्ड परीक्षासंदर्भात मोठा बदल होणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार (New Education Policy ) अभ्यासक्रमाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आल्याची माहिती बुधवारी शिक्षण मंत्रालयाने दिली. आता 2024 च्या शैक्षणिक सत्रासाठी पाठ्यपुस्तके तयार केली जाणार आहे. त्याशिवाय बोर्ड परीक्षा दोन टप्प्यात होणार आहेत. ज्या विषयांचा अभ्यास पूर्ण झाला, फक्त तेच पेपर देण्याचं स्वातंत्र्यही देण्यात येणार आहे. त्याशिवाय अकरावी आणि बारावीला दोन भाषा अनिवार्य करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एका भारतीय भाषेचा समावेश असायला हवा, अशी अट घालण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने काय काय निर्णय घेतले याबाबत जाणून घेऊयात..
बोर्ड परीक्षा आता वर्षातून दोन टप्प्यात होणार आहे. विद्यार्थी दोन्ही वेळा परीक्षा देऊ शकतात, सर्वोत्तम गुण ग्राह्य धरले जातील. अथवा टप्प्या टप्प्याने अर्ध्या अर्ध्या विषयांची परीक्षा देऊ शकतात.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नव्या शैक्षणिक आराखड्यानुसार (new curriculum framework), अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थांना यापुढे दोन भाषा अनिवार्य करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक भाषा भारतीय असायला हवी, अशी अट घालण्यात आली आहे.
शिक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, नवीन शैक्षणिक धोरणानुसार (New Education Policy ) अभ्यासक्रमाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आली आहे. 2024 च्या शैक्षणिक सत्रासाठी पाठ्यपुस्तके (textbooks) तयार केली जाणार आहेत.
सध्याच्या कठीण बोर्ड परीक्षेतून विद्यार्थांना दिलासा देण्यासाठी परीक्षेची सोपी पद्धत तयार करण्यात आली आहे. शिक्षणाच्या नव्या धोरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आकलन आणि यशाचे मुल्यांकन करता येईल. पूर्वी परीक्षेसाठी वर्षभर झटावे लागत होते. त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. पण आता सर्वांना समान संधी मिळेल. नव्या धोरणांमुळे विद्यार्थ्यांना चांगली कामगिरी करण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी मिळावी यासाठी वर्षातून किमान दोनदा बोर्ड परीक्षा दिल्या जात आहेत, असे शिक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आलेय.
बोर्ड परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतल्या जातील. त्याशिवाय ज्या विषयांचा अभ्यास झालाय, फक्त त्याच विषायाची परीक्षा देऊ शकतील. तसेच एकाच वेळी सर्व विषयांचीही परीक्षा दोन वेळा देऊ शकतात. सर्वोच्च गुण ग्राह्य धरले जातील.
अकरावी-बारावीसाठी विषयांची निवड विद्याशाखानिहाय नसेल... (उदाहरण म्हणून पाहायचे झाल्यास, अकरावीचा विद्यार्थी कोणत्याही शाखेतील (कला, विज्ञान आणि वाणिज्य) एकत्र विषय निवडू शकतो. त्यामुळे यापुढे कला, वाणिज्य अथवा विज्ञान शाखा असा झापडबंद मार्ग राहणार नाही. कोणतेही विषय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळेल.
विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची क्षमता विकसित करण्याची जबाबदारी शाळांवर असेल. याशिवाय बोर्ड परीक्षा चाचणी डेव्हलपर आणि मूल्यांकनकर्त्यांना हे काम घेण्यापूर्वी विद्यापीठ-प्रमाणित अभ्यासक्रमांमधून जावे लागेल.
Shri. Dharmendra Pradhan, Union Minister for @EduMinOfIndia releases National Curriculum Framework for School Education in New Delhi.
— PIB in Tamil Nadu (@pibchennai) August 23, 2023
Link 📕: https://t.co/7cGnXBc3Fv pic.twitter.com/QANOX2NHpV
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI