एक्स्प्लोर

BEd vs BTC : B.Ed करणाऱ्यांसाठी वाईट बातमी! फक्त BTC पदवीधरांना शिक्षक होता येणार

BEd vs BTC : सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत म्हटलं आहे की, प्राथमिक शिक्षकांच्या भरतीसाठी B.Ed केलेल्या उमेदवारांना अपात्र ठरवलं आहे. त्यामुळे प्रथमिक शिक्षक भरतीसाठी फक्त BTC उमेदवार पात्र ठरतील.

नवी दिल्ली : बीएड (B.Ed) आणि बीटीसी (BTC) करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. केंद्र सरकार आणि नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन (NCPE) दाखल केलेल्या एका याचिकेच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) एक मोठा निर्णय दिला आहे. हा निर्णय शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्या बीएड (B.Ed) आणि बीटीसी (BTC) करणाऱ्या उमेदवारांसाठी फार महत्त्वाचा आहे. तर, ही B.Ed करणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. आता फक्त BTC उमेदवारांना शिक्षक होता येणार आहे. 

B.Ed करणाऱ्यांसाठी वाईट बातमी! 

B.Ed विरुद्ध BTC DElEd (BTC/DElEd) प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान उच्च न्यायालयाचा जुना निर्णय कायम ठेवला आहे आणि प्राथमिक शिक्षकांच्या भरतीसाठी B.Ed केलेल्या उमेदवारांना अपात्र ठरवलं आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये प्राथमिक शिक्षक भरतीसाठी फक्त BTC उमेदवार पात्र ठरतील. हा निर्णय बीएड करणाऱ्या उमेदवारांना मोठा धक्का मानला जात आहे. बेसिक टीचर कोर्स (BTC/BSTC) म्हणजेच D EL.Ed कोर्स.

फक्त BTC उमेदवारांना शिक्षक होता येणार

सर्वोच्च न्यायालयाच्या या नव्या नियमामुळे राजस्थानमध्ये प्राथमिक शिक्षक भरतीतून बीएड उमेदवार बाहेर पडतील, तर BTC उमेदवारांची भरती केली जाईल. राजस्थान उच्च न्यायालयाने याआधी हा निर्णय दिला होता. आता केंद्र सरकार आणि NCPE दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीत कायम ठेवण्याचा निर्णय अखेर सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. त्यामुळे राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला महत्त्व मिळालं असून BTC अर्थात D EL.Ed उमेदवारांसाठी ही चांगली बातमी आहे.

बीएड उमेदवार प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक होण्यास अपात्र

बीएड पदवी प्राप्त सर्व उमेदवार आता प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक होण्यास अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे बीएड पदवीधर प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक होऊ शकणार नाहीत. बीएड आणि बीटीसी उमेदवारांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा हा मोठा निर्णय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा स्पष्ट अर्थ म्हणजे आता बी.एड उमेदवारांना यापुढे प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक बनता येणार नाही आणि फक्त बीटीसी उमेदवारांनाच प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक बनता येईल. सध्या तरी हा निर्णय राजस्थानमध्ये वैध असेल. पण पुढे जाऊन हा नियम राजस्थानसह इतर राज्यांतही लागू झाल्यास बी.एड उमेदवारांना मोठा फटका बसणार आहे.

एनसीटीईच्या अधिसूचनेमुळे सुरू झाला वाद

NCTE ने 2018 मध्ये अधिसूचना जारी केली होती, ज्यामध्ये B.Ed पदवीधारकांना REET स्तर I साठी देखील पात्र मानलं गेलं. एनसीटीईनं म्हटलं होतं की, जर बी.एड. जर पदवीधारक लेव्हल-1 मध्ये उत्तीर्ण झाले तर त्यांना अपॉइंटमेंटसह 6 महिन्यांचा ब्रिज कोर्स करावा लागेल. एनसीटीईच्या या अधिसूचनेला राजस्थान उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. दरम्यान, बी.एड. पदवीधारकांनी देखील स्वतःला REET स्तर I मध्ये समाविष्ट करण्यासाठी याचिका केली होती. यावर निर्णय होऊ शकला नाही. राजस्थान सरकारने REET 2021 ची अधिसूचना जारी केली होती, त्यामुळे B.Ed. पदवीधारकांना परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली होती.

BTC किंवा BSTC म्हणजे काय?

BSTC किंवा BTC यालाच DEL.Ed. असंही म्हटलं जातं. याचाच अर्थ प्राथमिक शाळा शिक्षक अभ्यासक्रम (Basic School Teacher Course) हा बारावी नंतरचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. हा कोर्स पूर्ण करणारे उमेदवार प्राथमिक शाळेच लेव्हल 1 म्हणजे पहिली ते पाचवी इयत्ता शिक्षक पदासाठी पात्र ठरतात.

REET म्हणजे काय? (What is REET)

आरईईटी (REET) म्हणजे राजस्थान शिक्षक पात्रता परीक्षा (Rajasthan Eligibility Exam for Teacher). ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाते आणि यामध्ये दोन स्तर (Level) असतात. स्तर 1 (Level 1) मध्ये इयत्ता 1 ते 5 पर्यंत शिक्षक तर, स्तर (Level 2) मध्ये इयत्ता 6 ते 8 पर्यंत शिक्षक पदासाठी परीक्षा घेतली जाते. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, आता REET Level 1 साठी फक्त BSTC किंवा BTC म्हणजे DEL.Ed. उमेदवार पात्र ठरतील. तर REET Level 1 साठी B.ed आणि इतर उमेदवार पात्र ठरतील.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: आलिशान एसयूव्हीला रोप बांधून थेट सुपर मार्केटमधील एटीएम उखडून बाहेर खेचलं, रोडने फरफटत नेणार तेवढ्यातच...
Video: आलिशान एसयूव्हीला रोप बांधून थेट सुपर मार्केटमधील एटीएम उखडून बाहेर खेचलं, रोडने फरफटत नेणार तेवढ्यातच...
मोठी बातमी! सोलापूर महापालिकेसाठी मविआचा फॉर्म्युला निश्चित; काँग्रेसला 45 जागा, शिवसेनेत वादाची ठिणगी
मोठी बातमी! सोलापूर महापालिकेसाठी मविआचा फॉर्म्युला निश्चित; काँग्रेसला 45 जागा, शिवसेनेत वादाची ठिणगी
AUS vs ENG : इंग्लंडचा 5468 दिवसानंतर ऑस्ट्रेलियात विजय, ॲशेसमधील बॉक्सिंग डे कसोटी दुसऱ्याच दिवशी संपली,विजयाबद्दल बोलताना बेन स्टोक्स म्हणाला...
ॲशेसची चौथी कसोटी दुसऱ्या दिवशी संपली, इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर 4 विकेटनं विजय, बेन स्टोक्स म्हणाला हा विजय खूप स्पेशल
Nawab Malik: भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट, नवाब मलिकांच्या एका घरात तिघांना उमेदवारी, भाजपच्या नाकावर टिच्चून दादांची खेळी!
भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट, नवाब मलिकांच्या एका घरात तिघांना उमेदवारी, भाजपच्या नाकावर टिच्चून दादांची खेळी!

व्हिडीओ

Sana Malik on BMC Election : भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट,नवाब मलिकांच्या घरात 3 उमेदवार
Sunil Tatkare On Alliance : मुंबईत राष्ट्रवादी युतीसोबत लढणार? तटकरे म्हणाले...
Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार
Narendra Bhondekar Bhandara : पत्नीचा पराभव, आमदार भोंडेकरांनी मागितली भंडाराकरांची माफी
Sanjay Raut Full PC : भाजपला ठाण्यात यावेळी शिंदेंचा पराभव करायचा आहे, राऊतांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आलिशान एसयूव्हीला रोप बांधून थेट सुपर मार्केटमधील एटीएम उखडून बाहेर खेचलं, रोडने फरफटत नेणार तेवढ्यातच...
Video: आलिशान एसयूव्हीला रोप बांधून थेट सुपर मार्केटमधील एटीएम उखडून बाहेर खेचलं, रोडने फरफटत नेणार तेवढ्यातच...
मोठी बातमी! सोलापूर महापालिकेसाठी मविआचा फॉर्म्युला निश्चित; काँग्रेसला 45 जागा, शिवसेनेत वादाची ठिणगी
मोठी बातमी! सोलापूर महापालिकेसाठी मविआचा फॉर्म्युला निश्चित; काँग्रेसला 45 जागा, शिवसेनेत वादाची ठिणगी
AUS vs ENG : इंग्लंडचा 5468 दिवसानंतर ऑस्ट्रेलियात विजय, ॲशेसमधील बॉक्सिंग डे कसोटी दुसऱ्याच दिवशी संपली,विजयाबद्दल बोलताना बेन स्टोक्स म्हणाला...
ॲशेसची चौथी कसोटी दुसऱ्या दिवशी संपली, इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर 4 विकेटनं विजय, बेन स्टोक्स म्हणाला हा विजय खूप स्पेशल
Nawab Malik: भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट, नवाब मलिकांच्या एका घरात तिघांना उमेदवारी, भाजपच्या नाकावर टिच्चून दादांची खेळी!
भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट, नवाब मलिकांच्या एका घरात तिघांना उमेदवारी, भाजपच्या नाकावर टिच्चून दादांची खेळी!
मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादीची 100 जणांची यादी, घरातील तिघांना उमेदवारी; सना मलिक यांनी सगळंच सांगितलं
मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादीची 100 जणांची यादी, घरातील तिघांना उमेदवारी; सना मलिक यांनी सगळंच सांगितलं
Krishnaraaj Mahadik: कोल्हापुरात भाजपची यादी येण्यापूर्वीच कृष्णराज महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल; म्हणाले, निवडणूक मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर लढवणार
कोल्हापुरात भाजपची यादी येण्यापूर्वीच कृष्णराज महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल; म्हणाले, निवडणूक मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर लढवणार
पुण्याचा गुंड बंडू आंदेकर निवडणुकीच्या मैदानात; घोषणाबाजी करत अर्ज भरला, कोणत्या पक्षातून लढणार?
पुण्याचा गुंड बंडू आंदेकर निवडणुकीच्या मैदानात; घोषणाबाजी करत अर्ज भरला, कोणत्या पक्षातून लढणार?
मोठी बातमी! पुण्यातील भिमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी बंद, 'या' कारणामुळे भाविकांना परिसरात प्रवेश बंदी
मोठी बातमी! पुण्यातील भिमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी बंद, 'या' कारणामुळे भाविकांना परिसरात प्रवेश बंदी
Embed widget