तो अंगावर थुंकला, शिव्या दिल्या, सोलापुरात 'नाईंट्या' थेट खाकी वर्दीशी भिडला, पोलिसांनी इंगा दाखवताच भावाचा पाय खोलात!
Solapur Crime : सोलापुरात शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा तरुण पोलीस शिपायाच्या अंगावरही थुंकला आहे.

Solapur Crime : राज्यात नागपूर जिल्ह्यात झालेल्या दंगलसदृश परिस्थितीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा मु्द्दा उपस्थित झाला आहे. बीड जिल्ह्यातील खून प्रकरणामुळेही राज्यात खळबळ उडाली आहे. असे अशतानाच आता सोलापुरात एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या छातीवर बुक्की मारत त्यांच्या शर्टला ओढून धक्काबुक्की केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...अन् पोलिसांनी तरुणाला घेतलं ताब्यात
मिळालेल्या माहितीनुसार नाईंट्या उर्फ ओंकार संतोष नलावडे असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. गुन्हा दाखल झालेला युवक आणि इतर दोन ते तीन इसम यांच्यात रस्त्यावर वाद चालू होता. यावेळी आरोपी हा फुटपाथवर स्वतःचे डोके आणि तोंड आपटून घेत होता. या कृतीमुळे त्याच्या डोक्यातून रक्त येत होते. हा वाद सोडवताना पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले होते. त्याला रिक्षातून पोलीस ठाण्यात नेण्यात येत होते. याच वेळी तरुणाने पोलिसांना धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.
शिवायाच्या अंगावर थुंकला, शिवीगाळ केली
पोलीस आरोपीला रिक्षातून घेऊन जात होते. मात्र आरोपीने पोलिसांशी हुज्जत घातली. पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना आरोपीनेपोलीस शिपायाच्या अंगावर थुंकून शिवीगाळ केली. तसेच शर्टाला धरुन ओढा-ओढ केली. त्यानंतर पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतरही त्याने पोलिसांशी हुज्जत घातली. आरोपीला डोक्यावर लागल्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करायचे होते. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी केली जात होती. याच वेळी आरोपी तरुणाने पुन्हा एकदा शिवीगाळ करून तो पोलिसांच्या अंगावर थुंकला.
पोलीस निरीक्षकांच्या हाताला लागला मार
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी त्यास शांत बसण्यास सांगत सांगितले. मात्र काहीही न ऐकून घेता त्याने माने यांच्या छातीवर डाव्या बाजूस हाताने बुक्की मारली. माने यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. या प्रक्रियेत पोलीस निरीक्षक माने यांना जबर मार लागला आहे.त्यामुळे आरोपी ओंकार नलावडे विरोधात शासकीय कामात अडथळा आणून पोलिसांना धक्का बुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दखल करण्यात आलाय.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

