एक्स्प्लोर

Ahilyanagar Crime News: नगरच्या व्यापाऱ्याचा दहा कोटी रूपयांच्या खंडणीसाठी खून; ज्याला वसुलीचं काम दिलं त्यानेच कारमध्ये गळा आवळला अन्...,22 दिवसांनी झाला उलगडा

Ahilyanagar Crime News: नगर मनमाड रोडवरील निंबळक बायपास जवळ नालीमध्ये दीपक परदेशी यांचा मृतदेह सापडला आहे. दीपक परदेशी यांचा जीव दहा कोटींच्या खंडणीसाठी घेतला गेला असल्याची माहिती समोर आली आहे.

अहिल्यानगर: अहिल्यानगरमधून बेपत्ता असलेल्या व्यापाराचा मृतदेह नालीमध्ये सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली. दीपक परदेशी असे व्यापाऱ्याचे नाव असून परदेशी हे 21 दिवसापासून बेपत्ता होते. दीपक परदेशी यांचे अपहरण करून खून केल्याचे निष्पन्न झालं आहे. नगर मनमाड रोडवरील निंबळक बायपास जवळ नालीमध्ये दीपक परदेशी यांचा मृतदेह सापडला आहे. दीपक परदेशी यांचा जीव दहा कोटींच्या खंडणीसाठी घेतला गेला असल्याची माहिती समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दहा कोटींच्या खंडणीसाठी धावत्या कारमध्ये नायलॉन दोरीने गळा आवळून व्यापाऱ्याचा खून केला, त्यानंतर त्यांचा मृतदेह रस्त्यालगतच्या नालीमध्ये फेकल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. 17) रात्री उघडकीस आला. दीपक लालसिंग परदेशी (68, रा. परदेशी मळा, बोल्हेगाव) असे खून झालेल्या व्यापाऱ्याचे नाव असून, ते 24 फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. पोलिसांकडून देखील त्यांचा शोध घेण्यात येत होता, त्यानंतर आता त्यांचं अपहरण करून खून केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली होती. 

या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. किरण कोळपे (38) व सागर गीताराम मोरे (28) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.मृत दीपक परदेशी यांचे तेलाचे दुकान आहे. त्यांचे विळद गावातील काही लोकांकडे पैसे होते. ही वसुली करण्याचे काम त्यांनी आरोपींना दिलेले होतं. मात्र, पैसे वसूल करता आले नाहीत, म्हणून त्यांनी काम दिलेल्या दीपक परदेशी यांनाच उचलून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचा कट रचला. 24 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन्ही आरोपी परदेशी यांच्या घरी आले. त्यांनी परदेशी यांना कारमध्ये बसवलं. कोळपे याने त्यांच्याकडे दहा कोटी रुपये मागितले. दीपक परदेशी यांनी आरोपींना पैसे देण्यास नकार दिल्याने मोरे याने परदेशी यांचे हात घट्ट पकडले. त्यानंतर त्यांचा नायलॉन दोरीने गळा आवळला, आणि त्यांचा जीव घेतला.

सीसीटीव्ही फुटेजमधील कारमुळे लागला छडा

पोलिसांनी दीपक परदेशी यांच्या घरापासून जाणाऱ्या रस्त्याचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले, या सीसीटीव्ही फुटेज पांढऱ्या रंगाची कार जाताना दिसली. ही कार दोन ठिकाणी सीसीटीव्हीमध्ये दिसल्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी ही कार कोणाची आहे, याचा शोध घेतला असता ती आरोपी किरण कोळपे याची असल्याची माहिती समोर आली, त्यानंतर चौकशीमध्ये सर्व माहिती समोर आली आहे. एमआयडीसी जवळील निंबळक बायपास रस्त्यावरती असलेल्या एका नाल्यामध्ये कुजलेल्या अवस्थेत दीपक परदेशी यांचा मृतदेह सापडला.

बेपत्ता झाल्याची तक्रार

दरम्यान दीपक परदेशी बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटूंबातील व्यक्तींंनी 25 फेब्रुवारी रोजी तोफखाना पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी तपास देखील केला. परंतु, परदेशी यांची कोणतीही माहिती मिळाली नाही. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोळपे याला अटक केल्यानंतर त्याने मृतदेह दाखवला.

कोळपे बडतर्फ पोलिस

या प्रकरणातील आरोपी किरण कोळपे हा पोलिस खात्यामध्ये होता. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्याला बडतर्फ करण्यात आलेले आहे. त्यानेच दीपक परदेशी यांच्या खुनाचा कट रचला होता.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

U19 World Cup : मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान
ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान
Multibagger Stock : थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, जाणून घ्या
थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
India Won U19 World Cup : भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
U19 World Cup : मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान
ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान
Multibagger Stock : थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, जाणून घ्या
थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
India Won U19 World Cup : भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
रामदास कदम म्हणाले सुनील तटकरेंनी गलिच्छ राजकारण केलं, मनिषा तुपे प्रत्युत्तर देत म्हणाल्या, राष्ट्रवादीच्या कामकाजात नाक खुपसू नये...
रामदास कदमांनी राष्ट्रवादीच्या कामकाजात नाक खुपसू नये, मनिषा तुपेंचं सुनील तटकरेंवरील टीकेला प्रत्युत्तर
परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला; वर्षभरात तब्बल एवढ्या फॉरेनर्सची भेट, संख्येत दुप्पटीने वाढ
परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला; वर्षभरात तब्बल एवढ्या फॉरेनर्सची भेट, संख्येत दुप्पटीने वाढ
अखेर काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्र, नागपूर कार्यालयात गटनोंदणी; गटनेतेपदी राजेश अडुर, महापौर कोण?
अखेर काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्र, नागपूर कार्यालयात गटनोंदणी; गटनेतेपदी राजेश अडुर, महापौर कोण?
Embed widget