एक्स्प्लोर

Worli Accident : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला अटक, मदत करणारे 12 जण ताब्यात 

Worli Hit And Run Case : वरळी अपघातानंतर तब्बल 48 तासांनंतर मुख्य आरोपी मिहीर शाहाला अटक करण्यात आली असून त्याची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. 

Worli Hit And Run Case : वरळी हिट अँड रन अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला (Mihir Shah Arrested) शहापूरमधून अटक करण्यात आलं आहे. या प्रकरणात मिहीर शाहाची आई आणि बहिणीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच या आरोपीला मदत करणाऱ्या 12 जणांनाही मुंबईच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे. 

मिहीर शाहाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवून वरळीमधील अॅट्रिया मॉलजवळ कावेरी नाखवा या महिलेचा जीव घेतला होता. त्यानंतर तो फरार झाला. आता पोलिसांनी दोन दिवसांनंतर त्याला शहापूरमधून अटक केली आहे. मिहीर शाहाची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे.  

अपघात झाल्यानंतर फरार झालेल्या मिहीर शाहाच्या मागावर मुंबई पोलिसांच्या आठ टीम होत्या. पोलिसांनी मिहीर शाह आणि त्याला मदत करणाऱ्या इतर 12 जणांना अटक केली आहे. मिहीर शाहने अपघातावेळी मद्यपान केलं होतं का, अपघातावेळी नेमकं काय घडलं याबद्दल अधिकची माहिती आता पोलिस घेतील. 

या आधी पोलिसांनी मिहीर शाहाच्या मैत्रिणीचा जबाब नोंदवला होता. तसेच आरोपीचे वडील राजेश शाह आणि ड्रायव्हर राजऋषी सिंहला पोलिसांनी अटक केली होती. पण राजेश शाहाला जामीन मिळाला आहे. 

मिहीरला पळून जाण्याचा सल्ला

या प्रकरणात राजेश शाह यांनी अपघात झालेल्या गाडीवरील पक्षाचा झेंडा आणि नंबरप्लेट बदलण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं. तसेच ही गाडी मुख्य पुरावा असून ती अज्ञात स्थळी लपवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचसोबत मिहीर शाहाने अपघात झाल्याची माहिती राजेश शाहांना फोनवरून दिल्यानंतर 'तू पळून जा, अपघात ड्रायव्हरने केल्याचं आपण सांगू' असा सल्ला दिल्याचंही पोलिस तपासातून समोर आलं आहे.

वरळी अपघातावरून राजकारण चांगलंच तापलं असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना या विषयावरून धारेवर धरलं आहे. मिहीर शाहाचे वडील राजेश शाह हे शिवेसना शिंदे गटाचे पालघरचे उपनेते आहेत. त्यामुळे सत्ताधारी हे आरोपीला पाठीशी घालत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. 

ही बातमी वाचा: 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar : भोंदू राजेंद्र गडगे याचा 'दत्तधाम दरबार' सील, पोलिसांकडून स्पॉट पंचनामा, अनेक औषधे ताब्यात
भोंदू राजेंद्र गडगे याचा 'दत्तधाम दरबार' सील, पोलिसांकडून स्पॉट पंचनामा, अनेक औषधे ताब्यात
Latur : लातूर हादरले, दोन अल्पवयीन चुलत भाऊ बेपत्ता, एकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू
लातूर हादरले, दोन अल्पवयीन चुलत भाऊ बेपत्ता, एकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू
Pimpri-Chinchwad: व्हॉट्सॲपवर भ्रष्टाचाराचे आरोप, भाजपचे दोन नेते आपापसात भिडले, आधी धमकी अन् नंतर हल्ला... नेमकं काय घडलं?
व्हॉट्सॲपवर भ्रष्टाचाराचे आरोप, भाजपचे दोन नेते आपापसात भिडले, आधी धमकी अन् नंतर हल्ला... नेमकं काय घडलं?
Dharashiv Crime News : शिवीगाळीचे रूपांतर भांडणात झालं अन्...; जमिनीच्या वादातून चुलत्याने 21 वर्षीय पुतण्याचा काढला काटा, धाराशिवमध्ये खळबळ
शिवीगाळीचे रूपांतर भांडणात झालं अन्...; जमिनीच्या वादातून चुलत्याने 21 वर्षीय पुतण्याचा काढला काटा, धाराशिवमध्ये खळबळ

व्हिडीओ

Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tanvi Kolte : बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
Tanvi Kolte : कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Embed widget