माता न तूं वैरिणी! आईच्या संमतीने नराधमाकडून सातवीतील मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार, वडिलांचीही साथ
Rape Case : आईने आपल्या सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार करवून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात न्यायालयाने आरोपी आईला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
Crime News : आईच्या संमतीने आरोपीने अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार (Rape Case) केल्याची घटना उघडकीस आली आहे. आईने आपल्या सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार करवून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात न्यायालयाने आरोपी आईला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. केरळमधील ही घटना उघडकीस आली आहे. कोझिकोड येथील न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. कोझिकोड न्यायालयाने एका 43 वर्षीय महिलेला तिच्या अल्पवयीन सावत्र मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 2021 मध्ये पीडितेवर तिच्या घराव्यतिरिक्त अनेक ठिकाणी बलात्कार झाल्याची माहिती समोर आली आहे.
आईच्या संमतीने आरोपीकडून सातवीतील मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार
महत्त्वाचं म्हणजे सावत्र आईने सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यासाठी एका व्यक्तीला मदत करत होती. आरोपी महिलेने या व्यक्तीला आपल्या सावत्र मुलीसोबत शारीरिक संबंध बनवण्यास वारंवार मदत केली. या घटनेतील 44 वर्षीय मुख्य आरोपीलाही न्यायालयाने 40 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच या घटनेची माहिती असूनही पोलिसांत तक्रार न केल्याने पीडित मुलीच्या वडिलांनाही सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
44 वर्षीय नराधमाला एकूण 40 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
नादापुरम फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्टाने (FTSC) 44 वर्षीय नराधमाला पॉक्सो कायद्यांतर्गत सातवीच्या विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. सरकारी वकील मनोज अरूर यांनी सांगितलं की, एफटीएससी न्यायाधीश सुहैब एम यांनी मुख्य आरोपी अनिलला वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी वेगवेगळ्या कालावधीची शिक्षा सुनावली आहे. आरोपीला एकूण 40 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
आरोपी आईला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
सरकारी वकील मनोज अरूर म्हणाले, सर्व दोषींना त्यांची शिक्षा एकत्रितपणे भोगावी लागेल. आरोपीला जास्तीत जास्त 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, त्यामुळे तो तेवढ्या कालावधीसाठी तुरुंगातच राहणार आहे. पीडितेची आजी आधीच 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नादापुरम विशेष न्यायालयाने सावत्र आईला एकूण 75 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
आईला वडिलांचीही साथ, अखेर न्यायालयाकडून मिळाला न्याय
पीडितेने सांगितलं की, या प्रकरणात पीडितेने वडिलांना घडत असलेल्या घटनेची माहित दिली होती. आपल्या मुलीसोबत घडलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांना न देत गुन्ह्याला पाठिशी घातल्याप्रकरणी पीडितेच्या वडिलांना सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आईवडील दोघांवरही पीडितेच्या लैंगिक छळाच्या आणखी एका प्रकरणात खटला सुरू आहे. मुख्य आरोपीने पीडित मुलीवर तिच्या घरी आणि आरोपीच्याही घरी नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला होता, ही बाब तिच्या वडिलांसह कुटुंबीयांना माहित होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :