एक्स्प्लोर

Digital Arrest : काळजी घ्या नाहीतर 'डिजिटल अरेस्ट' व्हाल; पैसे उकळण्याचा नवा फंडा नेमका काय? 

Digital Arrest : व्हिडीओ कॉल करायचा आणि समोरच्या व्यक्तीला आपण पोलिस, ईडी, सीबीआय अधिकारी असल्याचं सांगून लाखो रुपये उकळण्याचा नवा फंडा आता सायबर ठगांनी शोधून काढला आहे. 

मुंबई : वाढती सायबर गुन्हेगारी सध्या तपास यंत्रणांसमोरची डोकेदुखी ठरतेय. त्यात गेल्या वर्षभरात सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीसाठी एक नवा फंडा सुरु केलाय. तो म्हणजे डिजिटल अरेस्ट. याच डिजिटल अरेस्टच्या नावाखाली आतापर्यंत राज्यातील अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आलाय. पोलिस किंवा तपास अधिकारी असल्याचं सांगून हे गुन्हेगार फोन किंवा व्हिडीओ कॉल करतात. आतापर्यंत अनेक जण सायबर गुन्हेगारांच्या या नव्या चक्रव्यूहात अडकल्याचं समोर आलंय. 

वस्तूंची खरेदी ते वेगवेगळ्या बिलांचा भरणा,तिकीट काढणं किंवा पॉलिसी विकत घेणं हे सगळे व्यवहार तुम्ही आज घरबसल्या करु शकता. पण हे व्यवहार करताना सावध राहा. कारण तुमच्यावर नजर आहे सायबर दरोडेखोरांची आणि त्यांनी तुम्हाला फसवण्यासाठी आणलाय एक नवा फंडा... डिजिटल अरेस्ट.

मुंबईच्या ताडदेवमधील एका व्यक्तीनं डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात अडकून तब्बल 35 लाख रुपये गमावले आहेत. तर गुजरातच्या एका व्यक्तीलाही असाच आर्थिक फटका बसलाय. ही झाली फसवणुकीची उदाहरणं. पण ही फसवणूक नेमकी कशी होते ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या 'मन की बात' या कार्यक्रमात एका व्हिडीओतूनही सांगितलं आहे. 

डिजिटल अरेस्ट म्हणजे काय?

  • कॉल करणारे सायबर गुन्हेगार हे सीबीआय एजंट, आयकर अधिकारी किंवा कस्टम एजंट, ED, NCB किंवा पोलिस असल्याचं भासवतात.
  • फोन कॉलद्वारे संपर्क करून ते संबंधित व्यक्तीला व्हॉट्सॲप किंवा स्काईपसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे व्हिडिओ कम्युनिकेशनसाठी धमकावतात.
  • आर्थिक गैरव्यवहार, करचोरी किंवा इतर कायदेशीर उल्लंघनांसारख्या कारणांचा हवाला देऊन'डिजिटल अरेस्ट' वॉरंटची धमकी देतात.
  • फसवणूक करणारे पोलिस स्टेशनसारखे सेटअप तयार करतात जेणेकरून फोन केलेल्या व्यक्तीला त्यांच्यावर विश्वास बसावा.
  • वॉरंट रद्द करण्यासाठी किंवा कथित आरोपांमधून सोडवण्यासाठी पैशांची मागणी केली जाते.

2024 मधला 'सायबर दरोडा' किती कोटींचा?

सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून चालू वर्षात 1200 कोटी रुपयांची लूट करण्यात आली आहे. या फसवणूकीत सीए, निवृत्त बँक कर्मचारी, डॉक्टर अशा उच्चशिक्षित व्यक्तींचाही समावेश आहे. मुंबईत सायबर गुन्हेगारांनी
हजार कोटींपेक्षा जास्त रुपये उकळले. नोव्हेंबर महिन्यात 1181 कोटी रुपयांची सायबर फसवणुकीची नोंद करण्यात आली आहे. अशा प्रकारे या सायबर चोरट्यांनी कोट्यवधी रुपयांची लूट केली आहे. 

फसवणुकीसाठी वापरली जाणारी 6500 संशयित सिमकार्ड पोलिसांकडून बंद करण्यात आली आहेत.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget